राष्ट्राच्या व समाजाच्या कल्याणाकरीता शिक्षणांचा उपयोग झाला पाहिजे- महेशकुमार मारापल्ले
आई- वडीलांचे पाठबळ हीच यशाची गुरुकिल्ली
चाकूर (महावार्ता न्यूज) :येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत दि. 4 मार्च 2024 सोमवार रोजी सकाळी 10.30 वाजता प्र. प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली , केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी, महेशकुमार मारापल्ले यांचे राज्यस्तरीय आणि केंद्रीय विविध परीक्षा तसेच सेंट्रल व राज्य फूड सेफ्टी ऑफिसर परीक्षा संदर्भात मागदर्शन आयोजित करण्यात आले होते, प्रमुख उपस्थिती मध्ये समन्वयक प्रा. डॉ. शिवानंद गिरी, वैष्णवी मारापल्ले, विद्यार्थी प्र. रत्नदीप शिवनगे उपस्थित होते. प्रथम भाई किशनराव देशमुख यांच्या प्रतिभेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना मारापल्ले म्हणाले प्रत्येक पदवी ही तेवढीच महत्वाची असते परंतु विद्यार्थ्यांनी ” स्कोप” चा विचार केला पाहीजे. जि. प. शाळेतुन शिक्षण घेऊन आई-वडील व गुरुजन यांच्या प्रेरणेतुनच केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी झालो,ज्या विद्यार्थ्याला अपयश पचवता येते तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो, स्पर्धा परीक्षा ही राज्याची असो की केंद्राची,प्रत्येक स्पर्धा परीक्षेची प्रथम माहिती करून, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा, प्रत्येका असामान्य विद्यार्थ्या मध्ये ब्रेन असतोच या ब्रेन च्या सहायाने स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होऊ शकते, आपल्यातील आत्मविश्वास दुनावला की संघर्ष सुद्धा ठेगना वाटतो, कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी ही तितकीच तोलाची असुन ,आपल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. वाघमारे म्हणाले मानसाची विद्ववता हीच माणसाला मोठ बनवते, विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते असे संबोधित केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. शिवानंद गिरी तर सुत्रसंचालन विद्यार्थीनी अंकिता चेऊलवार, अबोली गोलावार यांनी केले ,
आभार प्रा. राजेश विभुते यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. भारत लासुरे,डॉ. नामदे गौंड, प्रा. डॉ. दत्तात्रय वाघुले, प्रा. मल्हारी जक्कलवाड, प्रा. व्यंकटेश माने, प्रा. सारीका जगताप, प्रा. बबिता मानखेडकर, प्रा. मंगल माळवदकर, डॉ. शाम जाधव, डॉ. मगदुम बिदरे, डॉ. राजेश तगडपल्लेवार, डॉ. संभाजी जाधव, डॉ. प्रकर्ष देशमुख,करिअर कट्टा विद्यार्थी संसद सदस्य, बाळासाहेब जाधव, एकनाथ भोसले, सोपान येमे यांनी परिश्रम घेतले.