जगत जागृती विद्यामंदिर चाकूर च्या अंकिता शिंदे ची राज्यस्तरावर निवड
महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे

चाकूर:जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जगत जागृती विद्यामंदिर चाकूरच्या इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या शिंदे अंकिता हिची विज्ञान परिसंवादामध्ये राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
“The millet super food or diet fad”अर्थात भरड धान्य एक उत्कृष्ट पोषण आहार ही आहार भ्रम या परिसंवादाच्या विषयावर केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक, तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक ,जिल्हास्तरावर एकूण 20 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक मिळवत विभाग स्तरावर तिची निवड झाली होती.तिच्या यशाची घोडदौड कायम ठेवूत विभाग स्तरावर तीन जिल्ह्यातून एकूण सहा स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर तिची निवड झाली आली आहे.
दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय परिसंवादामध्ये कुमारी अंकिता शिंदे ही जगत जागृतीची विद्यार्थिनी विभागाचे नेतृत्व करणार आहे याचा विद्यालयात सार्थ अभिमान आहे.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक संजय नारागुडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन तिचा गौरव केला.
तिच्या या उत्तुंग यशासाठी आणि भावी वाटचालीसाठी जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील चाकूरकर ,अध्यक्ष सर्वोत्तम राव कुलकर्णी, उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार ,सहसचिव बाबुराव बिडवे ,कोषाध्यक्ष सोमनाथ स्वामी ,संस्थेचे संचालक एडवोकेट विक्रम पाटील चाकूरकर ,शिवप्रसाद शेटे ,विठ्ठलराव सोनटक्के, महादेव काळोजी ,राजकुमार कदम ,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नारागुडे, पर्यवेक्षक प्रदीप ऊस्तुर्गे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थिनीस विज्ञान विभाग प्रमुख प्रकाश आयतलवाड यांनी मार्गदर्शन केले. सदरील विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.