महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबिर. 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबिर. 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
लातूर महावार्ता न्यूज प्रतिनिधी,
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संत गोरोबा काका सोसायटी कॉर्नर, (दसरा पार्क) वैभव सोसायटी,नांदेड रोड येथे महाराष्ट्र आर्यन सेना यांच्यातर्फे आज रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी महापौर दिपक सूळ यांच्या हस्ते तर प्रतिमेचे पूजन आरोग्यदूत नामदेवराव कदम यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरात महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक अविराजे निंबाळकर यांनी परिसरातील नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केल्याने तरुणांनी मोठा सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र आर्यन सेनेच्या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अभय दादा साळुंके यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी माऊली ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.
यावेळी माजी गटनेते मनपा. सुनिल बसपुरे, महाराष्ट्र युवा शक्ति सं.अध्यक्ष सुनिल सौदागर, माजी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोहन सुरवसे, युवा नेते राज क्षीरसागर,माजी चेअरमन विकास कांबळे, अभिषेक पतंगे, ब्लू पँथर संघटनेचे सं.अध्यक्ष साधू गायकवाड, युवा नेते मयूर बनसोडे, पिराजी साठे, सचिंद्र कांबळे, गोपाळ मगर, किशोर शिंदे सरांसह आलेल्या सर्व मान्यवरांचे आर्यन सेनेचे सं.अध्यक्ष अविराजे निंबाळकर, प्रल्हाद सौदागर, विजयमाला देडे, ज्येष्ठ मार्गदर्शक माणिक पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आर्यन सेना शहरप्रमुख प्रसाद बसपुरे, काशिनाथ वाघमारे, उमेश कांबळे, संभाजी बेळकने, राजाभाऊ सूर्यवंशी, मुजीब सौदागर, इस्माईल लोहार, रफिक शेख, मुन्ना शेख, नबी शेख, किरण कांबळे, अंकुश कांबळे, अविनाश मगर, शुभम जोगदंड, शुभम शिंदे, प्रविण मगर, आशिष कसबे, विशाल क्षीरसागर, विक्रांत क्षीरसागर, महेश हणमंते, विष्णू पेठकर, राहुल कांबळे, अभिजित कांबळे, अमोल गायकवाड, संतोष शिंदे, बालाजी मगर, पवन मुळे, अभिजित कांबळे, अतिश कांबळे, पंकज मगर, विकास सुतार, सोनवणे सर, अभिषेक पवार, अभिजित पवार, नंदू क्षीरसागर, योगेश पवार यांनी हे रक्तदान शिबिर पार पाडण्यास सहकार्य केले तसेच परिसरातील नागरिकांसह सर्व आर्यन सैनिक उपस्थित होते.