क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रिडादिनाचे भव्य उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

महावार्ता न्यूज:२ डिसेंबर शनिवार रोजी क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलाले आणि योग प्रशिक्षक तसेच प्रा. अनिल चवळे यांच्याहस्ते पार पडले. तर बक्षीस वितरण शाळेचे पालक-शिक्षक असोशियेशनचे उपाध्यक्ष रोहिदास कदम व ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, पंचायत समिती जळकोटचे सचिन काडवादे उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या सीईओ रितू मद्देवाड यांची मुख्य उपस्थीती लाभली. शाळेच्या प्राचार्या, मार्गदर्शक जेबाबेरला नादर, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, अकॅडमीक समन्वयक अनामिका शाह, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात शाळेचा क्रीडा ध्वज फडकवून बँड पथकासोबत चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. उत्कृष्ट परेड सादर करत उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी सांघिक तसेच इंडिव्हिज्युअल खेळात सहभागी झाले होते. या स्पर्धा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चार हाऊसेस ( Emerald, Pearl, Rubby, Sapphire ) मध्ये घेतले गेले. अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये शाळेने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. काही पालकांनीही आपल्या पाल्याच्या खेळाचे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून शाळेत उपस्थिती दर्शवली. सर्व खेळ अतिशय आनंदमय वातावरणात पार पडले. अनेक विद्यार्थ्यांनी आपली खेळातील कामगिरी बजावत विजय संपादन केले.
कार्यक्रमामध्ये मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगत खेळातील यश हे उंच भरारी घ्यायला शिकवतं तर, अपयश हे खचून न जाता पुन्हा लढायला शिकवतं अशा शब्दात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलं. मुलांमध्ये बेस्ट खेळाडू म्हणून अभय कानवटे तर मुलींमध्ये बेस्ट खेळाडू म्हणून आरती पुणे या दोघांनी उत्कृष्ट खेळी करून आपली मान उंचावली. यावर्षी सर्वोत्कृष्ट हाऊस म्हणून प्यारल हाऊस विजयी झाला त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या जेबाबेरला नादार यांनी केले. सूत्रसंचालन रत्ना यादव आणि कविता गिरी तर आभार प्रदर्शन शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रमुख इस्माईल शेख आणि क्रीडाशिक्षक राहुल अडसूळ, मनीषा नेगी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही अनमोल सहकार्य लाभले.