डी. बी. फार्मसी कॉलेजच्या वतीने विशेष कॅम्पेन पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन आणि चाकूर मध्ये फार्मरैलीचे आयोजन
महावार्ता न्यूज : संपादक सुशिल वाघमारे

चाकूर : महावार्ता न्यूज डी. बी.कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक औषध निर्माता दिना निमित्त पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन आणि चाकूर मध्ये फार्मरैलीचे आयोजन राधेय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डी . बी कॉलेज ऑफ फार्मसी, महाळंग्रा, ता. चाकूर येथे 25 आणि 26 सप्टेंबर रोजी समाजाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे योगदान असणाऱ्या औषध निर्मात्यांच्या कार्याची जाणीव ठेवत जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन आणि फार्मरैलीचे आयोजन करून जागतिक औषध निर्माता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील आयोजित पोस्टर कॉम्पिटिशन या स्पर्धे करिता उदघाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी म्हणून प्रमुख पाहुणे चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय थोंटे सर, विलासराव देशमुख फॉउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. बालाजी वाकुरे सर, चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक आर. व्ही. सुगावे सर व विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी चे प्रा. एस. एन. गडा सर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेश जी बेंबडे सर होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व पाहुणे मंडळी, संस्था तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सर्व विध्यार्थी स्पर्धक यांनी औषध निर्माता शपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संकुल संचालक श्री विवेक बेंबडे सर, डी. बी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, एम बी ए चे प्राचार्य डॉ. श्रीकांत ढगे सर, डी.बी. पब्लिक स्कूलचे प्राचार्य विशाल जाधव सर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून 25 सप्टेंबरला चाकूर मधून फार्मरैलीचे आयोजन केले होते. या रॅलीची सुरुवात चाकूरच्या जुन्या बस स्टॅन्ड पासून झाली. पुढे सोसायटी चौकामध्ये गेल्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्याबाबतीत फार्मासिस्टचे योगदान या विषयावर व कॅन्सर कसा होतो, त्याचे लक्षण काय आहेत व योग्य उपचाराने तो कसा बरा होतो या विषयावर पथनाट्य साजरे केले. पुढे महाविद्यालयाची रॅली मज्जित चौकात आली तिथे पण वरील दोन्ही विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधी शाळा, जय भवानी चौक व बोधी रोड चौक या ठिकाणी रॅली गेली व दोन्ही विषयांवर पथनाट्य सुद्धा सादर केले गेले. या रॅलीला व पथनाट्यांना चाकूर मधील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व महाविद्यालयातील मुलांचे कौतुक केले. पुढे रिफ्रेशमेंट करून फार्मरैलीचा शेवट करण्यात आला.
26 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय पोस्टर प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन चे महाविद्यालयात आयोजन केले गेले. या कॉम्पिटिशनचे उद्घाटन चन्ना बसेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संजय थोंटे सर यांच्या हस्ते झाले. या कॉम्पिटिशन साठी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी येणारे विषय देण्यात आले होते. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ड्रग डिस्कवरी , नेचुरलयास्टिक स्टडी ऑफ हरबल मेडिसिन फॉर बेटर हेल्थ, फार्मासिटिकल मॅन्युफॅक्चरिंग करंट ट्रेन्स अँड वॉट्स नेक्स्ट, फार्माकोविगीलान्स इंन इंडिया व रोल ऑफ फार्मासिस्ट इन स्ट्रेंथनिंग हेल्थ सिस्टीम या विषयांचा सहभाग होता. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय थोंटे सर म्हणाले कि समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी फार्मसी च्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये मध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत आणि त्या नवीन बदलाला अनुसरून वरील विषयांची निवड केली आहे.
या स्पर्धेसाठी आलेल्या 85 पोस्टरचे पाहुण्या परीक्षकांनी गुणात्मक मूल्यमापन केली. या स्पर्धेसाठी परीक्षक मूल्यमापक म्हणून चन्ना बसवेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राध्यापक आर व्ही सुगावे सर व विलासराव देशमुख फाउंडेशन चे प्रा. एस एन गडा सर यांनी काम पाहिले. या कॉम्पिटिशन मध्ये चन्ना बसेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्या पाठोपाठ स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी, उदगीरच्या विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आणि डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी, महाळंग्रा चे विद्यार्थी तृतीय स्थानी राहिले. स्पर्धेचे कॉम्पिटिशन बघता संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेश जी बेंबडे सर यांनी दोन उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर केली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. बालाजी वाकुरे सर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना वाकुरे सरांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे कौतुक करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश जी बेंबडे सर म्हणाले विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आमची संस्था नेहमी प्रयत्नशील असते आणि असे उपक्रम आम्ही राबवत असतो. विद्यार्थी हितासाठी राबवलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला म्हणून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व यापुढेही असे स्तुत्य उपक्रम राबवण्याचे त्यांनी विध्यार्थ्यांना हमी दिली. डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. जयदीप यादव सर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, संस्था पदाधिकारी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. जयदीप यादव सर यांच्या मार्गदरशनाखाली प्रा. गोळे वैष्णवी, प्रा. सराफ गणेश व प्रा. अबादर ममाता यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवरखेले ऐश्वर्या यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून प्रा. रतन घुले, अविनाश बिराजदार. गोपाळ शिंदे, माने शंतनू, रोडे अश्विनी, मरेवाड मयूर, सुरवसे दत्ता पाटील वैष्णवी, इंगळे मोनिका, दादेवाड स्वप्नाली, तांबोळी असीमिबी , किनकर विकी, सोमवंशी आकाश, रोहित गुंड, फहीम पठाण, शिवाजी येडके, बनसोडे मॅडम, लायब्ररीयन कांबळे बलवंत, ज्योतीराम पवार, अनील चव्हाण, गणेश चव्हाण, पांडुरंग बेंबडे ,अक्षय बेंबडे, गायकवाड डी. व्हि, रोहन किसवे, किरण कोडले, आकाश लासूने यांनी काम पाहिले.