महसूल सप्ताहानिमित्त गरजवंताना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मदत..
चाकूर:(महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे)

लातूर जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय चाकूर येथे 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपविभागीय अधिकारी चाकूर प्रतिक्षा भुते यांनी भूषविले.
याप्रसंगी तहसीलदार चाकूर रेणुकादास देवणीकर , परिविक्षाविधीन नायब तहसीलदार नितीन हरड उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी नारायण रामचंद्र घुगे, श्वेता उमाकांत चिंते, वर्षा नरसिंग सुरवंशी व चंदूकला किशन गायकवाड यांना अधिकाऱ्यांच्या हस्ते चेकचे वितरण करण्यात आले. याबरोबरच पुरवठा विभागाकडून लाभार्थ्यांना प्रलंबित शिधापत्रिकांचे वाटप यादरम्यान करण्यात आले.
तसेच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन परिविक्षाविधीन नायब तहसिलदार अक्षय म्हेत्रे यांनी केले.