ताज्या घडामोडी
लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर तर मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची नियुक्ती..
प्रतिनिधी

- महावार्ता न्यूज नेटवर्क लातूर: लातूर जिल्ह्यातील आय. ए. एस. अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदलीचे आदेश आले आहेत. प्रथमच लातूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाधिकारी म्हणून वर्षा ठाकूर घुगे
- यांची नियुक्ती झाली आहे. आजपर्यंत जिल्हाधिकारी म्हणून महिला अधिकारी रुजू झाल्या नाहीत. मात्र प्रथमच महिला अधिकारी रुजू झाल्यामुळे जनतेतून कौतुक केले जात आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनमोल सागर यांची नियुक्ती झाली आहे.
- लातूर चे जिल्हाधिकारी म्हणून वर्षा ठाकूर घुगे या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी म्हणून कारभार पाहतील तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनमोल सागर कार्यभार पाहतील..