आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

काँगेस दे धक्का , या पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश.

संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज अहमदपूर/प्रतिनिधी
देशातील जनतेचे हित जोपासून जगात देशाचा नावलौकिक करणारे लोकप्रिय व कर्तबगार यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यपद्धती वर विश्वास ठेऊन अहमदपूर तालुक्यातील काँगेस पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून लातूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अभिवचन यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी दिले .
काँगेस पक्षाने लातूर लोकसभा निवडणुकीत मुळ एससी ला बाजूला सारून असंवैधानिक, डॉ.बाबासाहेबांच्या घटनेच्या अपमान करून उमेदवार दिला असल्याने मुळ एससी समाजाचा अपमान केला असल्याने त्याचा बदला घेण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या चारी मुंड्या चित्त केल्या शिवाय राहणार नाहीत अशीही भावना यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर पदाधिकाऱ्यांनी केली.
पक्ष प्रवेश सोहळ्यात काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष दयानंद वाघमारे,काँग्रेस शहर समन्वयक प्रफुल्ल ढवळे,काँग्रेस चे युवा नेते अॅड. अमोल इरले यांच्या सह अनेक काँगेस च्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा विधानसभा प्रमुख गणेशदादा हाके पाटील,जिल्हा सरचिटणीस ॲड.भारत चामे, यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

पक्षप्रवेश सोहळ्यावेळी भारतीय जनता पक्षाचे
जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,शहर अध्यक्ष सुशांत गुनाले,माजी पंचायत समिती सदस्य माणिक नरवटे, धैर्यशील देशमुख,यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button