आरोग्य व शिक्षणदेश विदेश
नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे: संतोष हळदे
प्रतिनीधी पंजाब राठोड

हिंगोली महावार्ता न्यूज: राज्य शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सध्या नागपूर येथिल अधिवेशन स्थळी राज्य राज्यभरातून अंदोलक येत आहेत. आपणही हिंगोली जिल्ह्यातून आपल्या हक्कासाठी जाणे गरजेचे आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे.
१२ डिसेंबर २०२३ वार मंगळवार रोजी नागपूर येथे ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संतोष हळदे व मन्मथ मरशिवणे या पेन्शन फायटरच्या मार्फत करण्यात आले आहे.