स्वामी विवेकानंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

चापोली: दि.26/1/24 महावार्ता न्यूज शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. भारतामध्ये साजरे होणारे सर्व राष्ट्रीय सण हे लोकशाहीचे प्रतीक आहेत. यातच चापोली येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. याही वर्षी प्रजासत्ताक दिनी गुरुवारी सकाळी रामगिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वामी विवेकानंद विध्यार्थी ज्ञान रत्न पुरस्कार यावर्षी शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा अजय बलशेटवार या विद्यार्थिनीला जाहीर करण्यात आला. प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये शाळेचा नावलौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला. तदनंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये देशभक्तीपर गीते, मराठी लोकगीते, आदिवासी गीते यावरती विद्यार्थ्यांनी अभिनय सादर केले.
स्वामी विवेकानंद विद्यालय हे चापोली परिसरातील पंचक्रोशीतील एक नावाजलेले विद्यालय असून ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे कार्य या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. विद्यार्थी हे राष्ट्राचा आत्मा आहेत त्यांना ज्ञानाबरोबरच संस्कारात्मक शिक्षण देण्याचे कार्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे यामुळे समाजात चांगल्या नागरिकाबरोबरच विद्यालयात शिकून गेलेले विद्यार्थी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक घडामोडीचा वृत्तांत विद्यार्थी व पालकांसमोर सादर केले संस्थाध्यक्ष बाबुराव शिंदे यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना उत्तम अशा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निलेश मद्रेवार माजी पंचायत समिती सदस्य, विश्वनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य, नाथा मद्रेवार, विलास भंडारे, दिलीप गादेवार,गणेश स्वामी, बालाजी महाजन , शकुंतला शेवाळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार माधव मुर्गे यांनी मांडले