
महावार्ता न्यूज लातूर:केंद्रेवाडी येथील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील असंख्य युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक ,आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याने प्रभावित असनारे अहमदपूर चाकूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील हे नेहमी युवकांसाठी प्रभावशिल ठरले आहेत.
जातीपातीचे राजकारण न करता मतदासंघांतील जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहून त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. वृध्द,तरुण, युवक, महीला विध्यार्थी या सर्वांच्या मदतीला ते धावून जात असतात.
त्यामुळे युवकांना हे नेतृत्व प्रचंड आवडते. त्यांची कार्य पद्धती फार भावते. नव्या संघटना,नवे नवे पक्ष, कोणी पैशाची आशा दाखवून पक्षात प्रवेश करून घेणारे नेते यांच्या प्रभावाखाली न येता. केवळ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
अक्षय केंद्रे, सचिनजी केंद्रे,माधव केंद्रे, कार्तिक केंद्रे, निखिल केंद्रे, विशाल केंद्रे, शैलेश पूने, गोविंद शेळके, धनंजय देवकते, आदर्श देवकते, विजय दराडे, अजिंक्य देवकते, प्रशांत चाटे, भागवत दहीफळे आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. येणाऱ्या काळात युवकांच्या पाठीशी खंभिर उभे राहून भक्कम साथ देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. पुढील काळात सर्व युवक राष्ट्रवादी पक्ष संघटन वाढीसाठी जोमाने काम करतील असा विश्वास आहे. प्रसंगी विनोद आंबेकर, शहराध्यक्ष अजहर बागवान, अशोक सोनकांबळे उपस्थित होते.
दिवसेदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रेवेशाची मालिका चालूच आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात पक्ष संघटन वाढत आहे.