मनोरंजन

व्हॉइस ऑफ मीडिया लातूर जिल्हा शैक्षणीक मदत कार्यकारिणीची निवड जाहीर

मुलाखतीद्वारे निवड होऊन जाधव, घुटे, माने, आष्टेकर व पिसाळ यांची वर्णी

लातूर दि.17 महावार्ता न्यूज
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवणार्‍या संघटनेने देशभरात विविध प्रकारचे कक्ष निर्माण केले आहेत. त्यापैकीच एक शैक्षणिक मदत विभागाची स्थापना करण्यात आली असून या शैैक्षणिक कक्षाचे राज्यप्रमुख तथा व्हॉइस ऑफ मीडिया राज्य सरचिटणीस मा. चेतनजी कात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच लातूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीमध्ये मुलाखती घेऊन जिल्हयातील पाच पत्रकारांची शैक्षणिक मदत कक्षांच्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांची ही निवड व्हॉइस ऑफ मीडियाचे नुतन जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

व्हॉईस ऑफ मीडिया टीम

यामध्ये बाळासाहेब जाधव यांच्याकडे लातूर व रेणापूर या दोन तालुक्यांची जबाबदारी तर काकासाहेब घुटे यांच्याकडे औसा, निलंगा, आनंद माने यांच्याकडे शिरूर अनंतपाळ, देवणी, विष्णू आष्टेकर यांच्याकडे उदगीर, जळकोट तर योगीराज पिसाळ यांच्याकडे अहमदपूर व चाकूर या दोन तालुक्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. व्हाईस ऑफ मिडीयाच्या या शैक्षणिक मदत कक्षाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांना मदत करण्याचा संकल्प आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मिडीया शैक्षणीक कक्षाचे राज्यप्रमुख चेतनजी कात्रे, व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे, जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, मराठवाडा कार्याध्यक्ष बालाजी फड, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह दिपरत्न निलंगेकर, वामन पाठक, सितम सोनवणे, प्रभाकर शिरूरे, सुशांत सांगवे, श्रीराम जाधव, दिलीप मुनाळे, यशवंत पवार, मधुकर चलमले, धोंडीराम ढगे, वैभव पुरी, अरूण हांडे तसेच व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी, सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुलाखतीद्वारे निवड होऊन जाधव,घुटे,माने, आष्टेकर व पिसाळ यांची वर्णी
लातूर दि.17-02-2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button