ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी घेतली आमदार बाबासाहेब पाटील यांची भेट
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे
चाकूर: महावार्ता न्यूज
राज्यात मागील १२ वर्षांपासून काम उन करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व संगणक परिचालक या पदावर सामावून घेऊन किमान वेतन मिळण्याबाबत या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत परीचालकांनी रविवारी दि.२६/११/२०२३ रोजी सकाळी भेट घेऊन निवेदन दिले.
या विषयासंदर्भात आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना. गिरीशजी महाजन यांची भेट घेऊन आपल्या मागण्या निवेदनाद्वारे मांडून त्यावर योग्य ती मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी चाकूर अहमदपूर तालुक्यातील संगणकपरिचालक ज्ञानेश्वर सुर्यवंशी,मारोती सरवदे, मनोज बडगिरे, अहमदपूर तालुका सचिव प्रमोद सिंगाडे, चाकूर तालुका अध्यक्ष विष्णु भागे, हकांनी सय्यद, मंचक पाटील, सतीश मस्के, देविदास कांबळे, तुकाराम बोयने,सूर्यकांत कांबळे, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते…