रोटरी क्लब च्या वतीने नव्या शैक्षणिक वर्षात डिक्शनरी वाटप.
चाकूर (महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे)

रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने लातूररोड (ता.चाकूर ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवार दि.३ रोजी मराठी व सेमी इंग्रजी डिक्शनरीचे वाटप करण्यात आले.रोटरीच्या वतीने तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वाटप करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.रोटरीच्या वतीने साक्षरता उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या इंग्रजी डिक्शनरी वाटप करण्यात येणार आहे.
याचा शुभारंभ लातूर रोड (ता.चाकूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी व सेमी इंग्रजी डिक्शनरीचे वाटप करून करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल डावळे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे,सचिव विश्वनाथ एडके,साक्षरता उपक्रम चेअरमन विनोद निला,रो.शैलेश पाटील, संगमेश्वर जनगावे आदि उपस्थित होते.यावेळी रोटरीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे यांनी रोटरीच्या विविध सामाजिक कार्य व उपक्रमाची माहिती दिली.तर साक्षरता उपक्रमाचे चेअरमन विनोद निला यांनी विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षक चंद्रशेखर मिरजकर यांनी केले.यावेळी भरत कोरे, रमाकांत गोरगीळे, विश्वनाथ निला,शारदा अंतुरे,प्रभाकर कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.