मालिकातुन स्त्री नायिका नव्हे तर खलनायिका रूपाने चित्रित होत आहे –
आज विवाह संस्कार राहीला नसुन इव्हेन्ट म्हणुन साजरा होतोय

चाकूर(महावार्ता न्यूज) येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात महिला विकास कक्ष अंतर्गत क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता डिजाऊ जयंती निमित्ताने ” महिला सक्षमीकरण सप्ताह ” प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षते खाली, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. क्रांती मोरे ( शिवाजी महा.रेणापूर ), पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब बचाटे, महिला कक्षाच्या समन्वय प्रा. मंगल माळवदकर, प्रा. बबिता मानखेडकर, प्रा. राजेश विभुते, प्रा. डॉ . शाम जाधव, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. नामदेव गौंड,विद्यार्थीनी प्रतिनिधी भक्ती राठी यांच्या उपस्थितीत 6 जानेवारी रोजी संपन्न झाला.
महिला सक्षमीकरणावर संबोधित करताना डॉ. क्रांती मोरे म्हणाल्या महिला सबलीकरणासाठी स्त्री चे वैचारिक परिवर्तन झाले पाहीजे, स्त्री अस्मितेला नाकारणाऱ्या वाईट चालिरीती, रूढी , पंरपरा याला नाकारले तर महिला सक्षमीकरण शक्य आहे, जे जे आपल्या हिता विरुद्ध आहे त्याला महिलांना नाही मनायला शिकले पाहीजे,, आजची महिला देवा-दिकांच्या कथेच्या माध्यामातुन कर्मकाण्ड, विविध षडयंत्रात अडकली जात आहे, सक्षम आई, महिला, नागरीक म्हणुन स्त्रीयांनी आपली ओळख निर्माण केली पाहीजे, फक्त राष्ट्रमाता , क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना अभिवादन करणे म्हणजे महिला सबलीकरण नव्हे त्यांचे विचार आत्मसात करून जीवनाचा प्रवास करणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय, आज विवाह संस्कार राहिला नसुन इव्हेन्ट म्हणुन साजरा होतोय यामुळे फारकाळ विवाह टिकत नाहीत. कणखर जिजाऊ मुळेच शिवबा घडले, सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला म्हणूनच तंत्रज्ञान, उद्योग- व्यापार, नौकरी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक केत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत, आज सिरीयल मधुन स्त्री नायिका नव्हे तर खलनायिका म्हणुन दाखवली जात आहे याचे वाईट परिणाम महिलांच्या जीवनावर होत आहेत आहेत हे थांबवण्याचे धाडस आजच्या युवक- युवती मध्ये निर्माण झाले पाहीजे असे विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. वाघमारे म्हणाले ज्यांना स्त्री आई म्हणुन कळली ते शिवबा झाले, ज्याला स्त्री बहिण म्हणुन कळली ते ज्ञानोबा झाले, स्त्री- पुरुषांनी सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारला तर स्त्रीयांच्या जीवनात क्रातिकारी बदल घडून येईल असे संबोधित केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बबिता मानखेडकर,विद्यार्थीनी अंकिता चेऊलवार हीने या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले, सुत्तसंचलन प्रा. मंगल माळवदकर, आभार डॉ. नामदेव गौंड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी सूर्यवंशी, आकाश पाडूळे , सोपान येमे, सिध्देश्वर स्वामी,कोकरे दत्ता, हिरामन राठोड यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.