माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मराठवाडा सचिव पदी दत्तात्रेय बेंबडे यांची निवड.
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे

चाकूर महावार्ता न्यूज.दि.22 नोव्हेंबर.
चाकूर येथील समाजकार्यात सतत अग्रेसर असलेले दत्तात्रेय बेंबडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या मराठवाडा सचिव पदी निवड झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी बेंबडे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.ही निवड तिन वर्षासाठी करण्यात आली असून भारतीय संविधान,भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाची अचार संहिता यांचे काटेकोर पालन करावे.मराठवाडा सचिव पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जन हितासाठी वापर करावा.तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा असे नियुक्ती पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.
दत्तात्रेय बेंबडे हे चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील असून त्यांनी आजपर्यंत अनेक समाजहिताचे कार्य केले आहेत.समाजात अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम त्यांनी सतत केले आहे.अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे ते बोलताना म्हणाले.माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाने मला ही जबाबदारी दिली आहे. लवकरच मराठवाडा दौरा सुरू करणार आहे व गाव तेथे माहिती अधिकार कार्यकर्ता अशी मोहीम राबवणार आहे,मी या अगोदर ही माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे.मराठवाड्यात कोणावरही अन्याय झाला असेल तर मि त्या व्यक्तीला निसंकोच पणे तात्काळ मदत करणार असल्याचे बोलताना बेंबडे यांनी सांगितले.
दत्तात्रेय बेंबडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या मराठवाडा सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे राजकीय,सामाजिक,पत्रकार संघटना,शासकीय कर्मचारी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.