पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांचा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा सल्ला
महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे

“” अमली पदार्थ हे समाज आणि देशासाठी घातक”
— पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांचे प्रतिपादन.
चाकूर: महावार्ता न्यूज
“समाजातील अमली पदार्थाचे व्यसन म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. तंबाखू ,गुटखा, चरस, गांजा इत्यादीचे सेवन मानवाच्या आरोग्यास घातक असून ते समाज आणि देशाच्या हितामध्येही घातकच आहे.” असे प्रतिपादन चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी जगत जागृती विद्या मंदिर चाकूर येथे 15 सप्टेंबर जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,”दारू सारख्या व्यसनामुळेही अनेक संसार उध्वस्त झाल्याचे आपण समाजामध्ये पहात आहोत म्हणून निरोगी पिढी निर्माण होणे देशाच्या भविष्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी असणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नारागुडे हे होते, तसेच पर्यवेक्षक प्रदीप उस्तुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, स.पोलीस अधीक्षक देवसरे सर, तसेच ए. एस. पी .निकेतन कदम आणि पोलीस निरीक्षक नरवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे सरांचे व्याख्यान जगत जागृती विद्या मंदिर चाकूर येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कदम यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
चाकूर: