राममंदिर ,हिंदुंच्या घरोघरी उत्साही वातावरण, गावोगावी सजली मंदिरे अन् श्रीरामांच्या नामे दुमदुमले मोहल्ले.
चाकूर: महावार्ता न्यूज भारतात दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त राम लल्लाच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली, यात महिला डोक्यावर कलश, तुळशीवृंदावन, टाळ, मृदंगात व लेझीम च्या गजरात शिस्तबद्ध श्रीराम नामाचा गजर करत मोठ्या उत्साहात सोहळा व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यात लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत मोठ्या आनंदाने सहभाजी झाले होते. चाकुर शहरात तालुक्यांत नव्हे तर जिल्ह्यात मोठा उत्साह दिसून आला. महिला वृद्ध, बालके ,पुरुष स्त्रिया युवक युवती यांच्यात प्रचंड उत्साह होता. प्रत्येक गाव खेड्यात देखील मिरवणुका , प्रत्येक मंदिर सजलेले, हिंदू बांधवांचा घरासमोर रांगोळी, सडा, सजावट पाहण्यात आली.
सायंकाळी अनेकांच्या दरात दिवे लावण्यात आली होती जसे दिवाळीच्या सणाला करतात अगदी तसेच. काहींनी तर घरवर गुडी पाडव्याच्या दिवशी उभारण्यात येणारी गुडीच उभारली होती. हे सर्व नाविन्य राम मंदिर उभारण्यात आलेल्या रामाच्या मूर्ती प्रतिस्थापणेच्या आनंदात चालू आहे.
चाकुर शहरात राम मंदिर येथे यज्ञ, महा आरती, कार सेवकांचा सत्कार करण्यात आला. रेड्डी कॉलनी येथे राम मंदिर उभारण्यात आले आहे त्या ठिकाणी कॉलनीतील परिवाराच्या वतीने भव्य सोहळा आयोजीत करण्यात आला होता. शहरातील सर्वच मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. विश्र्वशांतिधाम मंदिरापासून ते राम मंदिर पर्यंत भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. याकामी सर्वांच्या योगदान लाभले..
आज हा उत्साह हिंदू बांधवांचा आनंदाचा क्षण होता…
गावागावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक व जय श्रीराम च्या घोषणा ने परीसर दुमदुमला होता. भारतात हिंदू सण आज रोजी साजरा झाला.