शिवयंतीनिमित्त चार दिवस भरगच्च कार्यक्रम, रक्तदान शिबिर संपन्न
६६ वै रक्तदान करून विलासराव पाटील यांनी तरुणाईला रक्तदान चळवळ गतिमान करण्याचा संदेश दिला.
चाकूर महावार्ता न्यूज : येथे सोमवारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ६:३० वाजता तुलाजाभवानी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्ध अभिषेक करण्यात आला व भवानी मातेची आरती करण्यात आली. सकाळी १० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ध्वजारोहन करण्यात आले. जय भवनीमंदिर शिवाजी महाराज चौक ते विवेकानंद चौक अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
११ च्या सुमारास सोसायटी चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी उपनराध्यक्ष विलासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वतः उद्घाटक विलासराव पाटील यांनी ६६ वे रक्तदान करून रक्तदान चळवळ गतिमान करण्याचा संदेश दिला.
यावेळी ५४ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान हे अमूल्य दान आहे आपल्यामुळे एकाध्याचा प्राण वाचू शकतो. उन्हाळयात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असतो. आपण वर्षभरात ४ वेळा जरी रक्तदान केले तरी चालते. आपल्याच शहरातील विनायराव पाटील यांनी देखील विक्रमी रक्तदान केले आहे. त्यांचाही तरुणाईने आदर्श घ्यावा. रक्तदान शिबिराप्रसंगी सुभाष काटे,सभापती भागवत फुले,आधार फाउंडेशन चे शिवदर्शन स्वामी, गंगाधर केराळे, पप्पुभाई शेख,बाळू जाधव, बाळू इरवाणे, सोमेश्वर शेटे विजय धनेश्वर उपस्थित होते.
मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी विश्र्वशांतीधाम मंदिर याठिकाणी सकाळी ११ वाजता निबंध स्पर्धा, १२ वाजता चित्रकला स्पर्धा, दुपारी किल्ले आकर्षण स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता जय भवानी मंदिर येथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. बुधवारी २१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्व शिवभक्तानी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तर शुक्रवार २४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आ. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चाकूर केसरी भव्य खुल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल येणार आहेत. असा भरगच्च कार्यक्रम शिवजयंती महोत्सव समिती चाकुर् द्वारा आयोजित केला आहे..