स्वच्छता रॅली सह पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी केले प्रबोधन – शालेय विद्यार्थी बनले स्वच्छता दुत

चापोली महावार्ता न्यूज प्रतिनिधि: स्वामी विवेकानंद विद्यालय चापोली तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत “स्वच्छता पाळा रोगराई टाळा”, हे पथनाट्य विद्यार्थ्यीनी गावातील संदीप कलेक्शन,ग्रामपंचायत समोर सादर करुन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
मोक्षदा माने,प्रतिक्षा श्रीमंगले, प्रतिक्षा मरेवाड, रोहिणी माळी ,श्रद्धा गडदे स्वामी शिवलीला या विद्यार्थ्यांनी सुंदर अभिनय करुन उपस्थितांची मने जिंकली.
शेवटी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.यावेळी रामगीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, हरिभाऊ मद्रेवार , आबासाहेब शिंदे, हिंपळनेरचे माजी उपसरपंच लालासाहेब शिंदे,मुरहारी येणगे ,किरण मद्रेवार, मुख्याध्यापक व संचालक व्यंकटेश शिंदे , मुख्याध्यापक माधव होनराव यांच्या सह अनेक गावकरी व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. पाहुणे आबासाहेब शिंदे यांनी सदर पथनाट्यास 501/ रुपयाचे बक्षीस देऊन पथनाट्यातील विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
स्वतः मुख्याध्यापक व्यकटेश शिंदे यांनी परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन स्वच्छता, व आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रबोधन केले.
यावेळी स्वच्छता रॅली काडून शाळेच्या परिसरातील नागरिकांना कचरा घंटागाडीमध्येच टाकावा यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली.
शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिक्षक विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका स्वाती मुसने,सुशील वाघमारे , विठ्ठल गवळे,अशोक कोतपोलू परमेश्वर मोटाडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.