ओढ लागली जीवाला, आतुरता सवंगड्यांच्या भेटीची.
माजी विद्यार्थी मेळाव्यास जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे - प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे

महावार्ता प्रतिनिधी चाकूर : येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात उद्या शनिवार दि.1 जून 2024 रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यासाठी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मेळाव्याचे संयोजक डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले आहे.
या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून शिक्षक, प्राध्यापक, वकील, उद्योग, व्यवसाय, पत्रकारिता, प्रशासकीय सेवा, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक , शेती, कॉन्ट्रॅक्टर, बँक व इतर क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत आहेत. तसेच ते उत्तम नागरीक म्हणून आप- आपले कर्तव्य बजावत आहेत.
आपणा सर्वांशी विचारविनिमय करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
स्नेह -मेळाव्यास येताना महाविद्यालया बाबतचा आपला अभिप्राय व एक फोटो सोबत घेऊन यावे असेही आवाहन प्राचार्य डॉ. शिंदे यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्यासह माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत शेटे, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळे,सचिव सिद्धेश्वर पवार, कोषाध्यक्ष मधुकर कांबळे,सहसचिव ज्ञानोबा येमले,सदस्य प्रा.स्वाती नगराळे,प्रा. मल्हारी जक्कलवाड,डॉ. रमेश साळी,प्रा. राजेश विभुते,डॉ. राजेश तगडपल्लेवर, डॉ.जनार्धन वाघमारे, डॉ.प्रकर्ष देशमुख,डॉ. संभाजी जाधव, डॉ. श्याम जाधव,प्रा. व्यंकटेश माने,प्रा.बबिता मानखेडकर, प्रा.मंगल माळवदकर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मेळाव्याच्या पूर्व संध्येला पूर्व तयारीसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी, माजी विदयार्थी संघाचे पदाधिकारी यांच्यासह सिने कला दिग्दर्शक सतीश पांचाळ, संगमेश्वर जनगावे, विनोद निला, सुधाकर हेमनर, संग्राम वाघमारे, ओमप्रकाश सुवर्णकार उपस्थित होते.