‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश याञा चाकुरात ! युवा मोर्चाच्या वतीने स्वागत.
महावार्ता न्यूज - भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव युवराज पाटील यांच्या वतीने स्वागत

चाकूर महावार्ता न्यूज (सुशिल वाघमारे)दि-८- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने चाकुरात अमृत कलश याञेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा भैरवीताई वाघ,प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक,प्रदेश उपाध्यक्ष धनराज गुट्टे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दत्ता चेवले,युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्या ललिता जाधव, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
चाकूर शहरात युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड.युवराज पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या अमृत कलश याञेचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद चौक येथे चाकूर शहर व विविध गावातील मुठभर माती सुशोभित कलशामध्ये जमा करण्यात आली.
यावेळी मातीस नमन व वीरास वंदन करुन उपस्थितांना पंचप्राण प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात मेरी माटी मेरा देश या अभियानास १५ ऑगस्ट पासून सुरूवात करण्यात आली असल्याचे सांगून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील,युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाने मराठवाडा विभागात आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मराठवाडा दौऱ्याची सुरूवात केली असल्याचे सांगितले.
चाकूर शहरातून अमृत कलश यात्रा काढुन प्रदेश कमिटीकडे कलश समर्पित करण्यात आले.पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करुन शुरवीरांच्या स्मरणार्थ अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.
यावेळी नगरसेवक नितीन रेड्डी, साई हिप्पाळे,शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे,माजी नगरसेवक संतोष माने, रमेश पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गजानन करेवाड, आनंद बेजगमवार, विश्वनाथ काथवटे, अमित पाटील, दिपक जनवाडे, ऋषि केदासे आदिसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.