जन्मापासून मरेपर्यंत च्या सुखसोयी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना साथ द्या-चित्रा वाघ.
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज अहमदपुर /प्रतिनिधी
काही राजकीय मंडळी जनतेला राजकारणा पुरते गृहीत धरून सत्ता मिळवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहेत. जन्मा पासून मरेपर्यंतच्या जनतेच्या सुख सोई करून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्याचे अहवान भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आयोजित महीला मेळाव्यात केले.
भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर शहरातील सानवी मंगल कार्यालयात महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ बोलत होत्या.
माता गर्भवती राहील्या नंतर तिच्या पोषण आहाराची काळजी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. मुलीसाठी सुकन्या योजना राबवून महीलाचा सन्मान केला आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजना ही सुद्धा महीलाच्याच नावाने सुरू केली असून 11कोटी स्वच्छतागृह बांधून देऊन महीलाची आब्रु राखली आहे, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरुन हर घर नल योजना प्रत्येक गावात राबवली असुन कोरोणाच्या काळात मोफत लस देऊन जनतेला जिवणदान दिले असून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करुन जनतेला मोठा दिलासा देण्याचे महाणकार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असल्याने येणाऱ्या 7 में रोजी होणाऱ्या निवडणुकीत कर्तव्यनिष्ठ असलेले भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे.
संसदेत शंभर टक्के उपस्थिती दाखवून मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणनारे सुधाकरराव श्रृगांरे आहेत. सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असल्याचे ही यावेळी डॉ.अर्चना पाटील चाकुरकर सांगितले.
महीला मेळाव्याच्या मंचावर महायुतीचे उमेदवार खा.सुधाकरराव श्रृगांरे, डॉ. अर्चना पाटील चाकुरकर, महीला मोर्चा च्या प्रदेश सरचिटणीस रेखा तरडे , खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांची कन्या सुप्रिया पायाळ, अॅड. जयश्री पाटील, माजी सभापती अयोध्या केंद्रे, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे,महीला मोर्चा च्या अहमदपूर तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, चाकुर तालुका अध्यक्षा मणिषा नवणे,जिल्हा उपाध्यक्षा पुष्पा तेलंग, जिल्हा सरचिटणीस प्रणिता बेंबळगे,राष्ट्रवादी काँग्रेस महीला मोर्चा च्या जिल्हा अध्यक्षा मिनाक्षी शिंगडे,तालुका अध्यक्षा शाहूताई कांबळे, धनश्री आर्जूने,मीनाताई भोसले, संध्या राजपूत, महीला मोर्चा च्या शहराध्यक्षा कल्पना महाजन,अवंतीताई कुलकर्णी,सत्यभामा चिंते,आशा रोडगे,दैवशाला शिंदे,मिनाक्षी तौर, लक्ष्मी पांचाळ यांच्या सह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस महीला मोर्चा च्या पदाधिकारी व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मेळाव्याचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा च्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता आबंदे तर आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.
सदरील महीला मेळावा यशस्वी करण्यासाठी धैर्यशील देशमुख, डॉ. सिद्धार्थ सुर्यवंशी, निखिल कासनाळे, अमित रेड्डी,श्रीकांत देशमुख, द्वारकादास नाईक यांच्या सह भारतीय जनता पक्षाच्या महीला मोर्चा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.