सामाजिक

शेतरस्त्याच्या चळवळीतही हेर येथील अल्पभुधारक शेतकऱ्यांना रस्त्यासाठी भोगाव्या लागत आहेत नरक यातना 

 

उदगीर / सुशिल वाघमारे

महसूल प्रशासन महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम जोरात चालवली असली तरी हेर येथील अल्पभुधारक शेतकऱ्यांचा शेतरस्ता मात्र दोन शेतकऱ्यांच्या वादात बंद पडलेला रस्ता महसूल प्रशानाच्या नजरेतून दुर्लक्षित राहिल्याने या शेतकऱ्यांचे खुपच हाल होत असून या भागातील शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या चळवतीतही चक्क नदिच्या पाण्यामधून दोनशे ते तिनशे मिटर अंतर जिवावर उदार होऊन पार करावे लागत आहे. हेर येथील पश्चिम शिवारातील एका भागात एक्कर ते दिड एक्कर शेती असणारे तिस ते पस्तीस शेतकरी असून त्या शेतकऱ्यांना कायमच शेतरस्त्याची समस्या भेडसावत असते.

 

पाण्यातून वाट काढत शेताकडे जाताना शेतकरी महीला

गेल्या दोन महिण्यापासून तर या शेतकऱ्यांवर वाटेतील शेतकऱ्यांकडून कहरच झाला असून वाटेतील एका शेतकऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून नदिच्या कडेने असलेला चालू रस्ता एकमेकाच्या वादात बंद केल्याने या शेतकऱ्यांना हक्काचा रस्ताच राहिला नाही.यामुळे या शेतकऱ्यांना नदिच्या पाण्यातून जिव मुठीत धरुन रस्ता शोधावा लागत आहे.मुख्य शेतरस्त्यापासून काहीं अंतर आत गेल्यास एक नदी असून त्या नदिच्या दोन्ही बाजूला दोन बलाढ्य शेतकरी आहेत.त्यातील एका शेतकऱ्याच्या बाजूने गेल्या काहीं वर्षापासून रस्ता होता.व याच रस्त्याचा अंदाज घेऊन नदिच्या पुढे वळण रस्त्यापासून शासनाच्या वतिने शेतरस्त्याचे कामही करण्यात आले होते.परंतू नदिकाठच्या शेतकऱ्याने माझ्याकडून रस्ता नाही.यापुढे तुमचा पलिकडून रस्ता आहे.असे म्हणून अचानक रस्ता खोदून काट्याकपाट्याने रस्ता बंद केला.व नदी पलिकडच्या शेतकऱ्यानेही तुम्ही पुर्वी पासून त्या रस्त्याने जाताय व तुमचा तोच रस्ता आहे.असे सांगून त्याच्याकडून येण्यास मज्जाव केला.याबाबत या शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले व नायब तहसिलदारांनी जायमोक्यावर येऊन परिस्थीतीची पाहणी केली.मात्र या घटनेस दिड महिणा उलटला तरी अद्याप तहसिल मार्फत या रस्त्या बाबत कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही.जुन व जुलै महिण्याच्या प्रारंभी अल्प पाऊस असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कोरड्या नदितून जाऊन पेरण्या उरकून घेतल्या.मात्र जुलै महिण्याच्या शेवटी एका दिवशी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या वाटेतील नदित दोन ते तिन फुट पाणी साचले आहे.यामुळे हा रस्ता बंदच झाला.पशुंना घेऊन जाणे व शेतीचे खुरपणी,फवारणी व कोळपणी ही कामे अद्याप ठप्प असून काहीं शेतकरी पशुंना चारा आणण्यासाठी महिला,पुरुष चक्क नदिच्या मधोमध जवळपास तिनशे मीटरचे अंतर जिव मुठीत घेऊन पार करीत आहेत.हि कसरत नदिच्या बाजूचे दोन्ही शेतकरी दररोज उघड्या डोळ्यांनी पाहतात.पण त्यांना याचे काहिहीं वाटत नाही.रस्ता नाही म्हणजे नाही.यावर ते ठाम आहेत.

 

महसूल प्रशासन शेतरस्त्याचा कितीही दिंडोरा पिटत असले तरी त्यांचे अभियान या शेतकऱ्यांपुढे अपयशी ठरले असून महाराजस्व अभियानाच्या अजेंड्यावर अल्पभुधारक गोरगरीब शेतकरी नाहीत की काय असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.यातील काहीं शेतकऱ्यांना तहसिल व प्रशासन काय तेही माहित नसून कोणता राजकीय वरदहस्तही नाही.यामुळे जावेतरी कोणाकडे असा प्रश्न पडला असून निमूटपणे या नरक यातनेच्या त्रासाला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.तरी नवनियुक्त जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाने याकडे लक्ष घालून या गोरगरीब शेतकऱ्यांना नेमका कोणत्या बाजूने रस्ता आहे.याची चौकशी करुन रस्ता खुला करुन द्यावा.अन्यथा महसूल प्रशासन राबवित असलेले महाराजस्व अभियानाचा कितीही दिंडोरा पिटला तरी ते अभियान जिल्ह्यात या अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या रस्त्याअभावी अधुरेच आहे.असे समजावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button