आरोग्य व शिक्षण
रोटरी क्लबच्या वतीने राम जोगदंड यांना राष्ट्रशिल्पकार पुरस्कार जाहीर
महावार्ता न्यूज - संपादक सुशिल वाघमारे

बीड ता प्र- जिल्ह्यातील माजलगाव रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक , शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो.या वर्षीचा राष्ट्र शिल्पकार शिक्षक पुरस्कार बंजरानगर तांडा येथील जि.प.शिक्षक राम जोगदंड यांना जाहीर करण्यात आला आहे.
बीड च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, यांच्या हस्ते रो गणेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 27 सप्टेंबर 2023 बुधवारी सुवर्ण गंधा मंगल कार्यालय गढी रोड माजलगाव जिल्हा बीड याठीकणी 4:30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने राम जोगदंड चे अभिनंदन केले जात आहे.