विद्यार्थ्यांना मोफत पास चे वाटप, विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापकांनी मानले आभार
चाकुर प्रतिनिधी (सुशिल वाघमारे)
भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात मोफत पास चे वाटप करण्यात आले,यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींना महाराष्ट्र शासनाच्या परिवहन मंडळाच्या या सेवेचा लाभ मिळणार आहे,या पासची सवलत जवळपास दीडशे मुलींना मिळाली यामुळे चापोली,आनंदवाडी,बोथी,शिरनाळ,कलकोटी,मोहनाळ कडमुळी,लातूर रोड,कबनसांगवी,उजळंब या गावावरून येणाऱ्या विद्यार्थिनीना या पास ची सवलत मिळाली यामुळे मुलींचा वाहतुकीवर होणारा खर्च बऱ्याच अंशी कमी झाला.
यामुळे पालक वर्गातून मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.यासाठी चाकूर येथील वाहतूक नियंत्रक शिवाजी तोगरगे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्व विद्यार्थिनींनी आभार मानले तसेच विद्यार्थिनीच्या मार्फत साडेचार ते पाच या वेळेमध्ये अहमदपूर ते लातूर बस सुविधा सुरू करावी अशी विनंती करण्यात आली कारण येणाऱ्या बस ह्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्यामुळे वाहक बसमध्ये प्रवेश करू देत नाहीत त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मुलींची गैरसोय होत आहे,यावेळी येणाऱ्या बस आल्या की एकदाच दोन-तीन गाड्या येतात आणि काही वेळा एक एक तास गाड्या येत नाहीत यामुळे विद्यार्थिनीला बसची वाट बघत बसावे लागत आहे, त्यासाठी एक लोकल बस साडेचार ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांसाठी सोडली तर खूप खूप सहकार्य होईल अशी मुलींची मागणी आहे याबद्दल वाहतूक नियंत्रक शिवाजी तोगरगे ही मागणी वरिष्ठांकडे सांगू व विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले त्याबद्दल विद्यार्थिनींनी त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापिका एस.डी.पवार इतर कर्मचारी वर्ग ही उपस्थित होते.