मनोरंजन

पदवी प्राप्त विद्यार्थ्यानी आई- वडिलांच्या कष्ठाची जाणीव ठेऊन जगलं पाहिजे- नेटके

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न

किनगाव (महावार्ता न्यूज)माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जग खूपच जवळ आलं असून जगाला एका कुटुंबाचे स्वरूप प्राप्त झाले आहे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून आपण कुठल्या पद्धतीने तंञज्ञानाचा वापर करीत आहात याचे भान ठेवत पदवी प्राप्त करणाऱ्या युवकांनी स्वतःआत्मपरीक्षण करावे वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत ज्या आई-वडिलांनी आपल्यासाठी कष्ट सहन केले त्याची जाणीव ठेवून जगलं पाहिजे असे प्रतिपादन नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड आणि श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या किनगांव येथील महात्मा फुले महाविद्यालयाने बी ए बी कॉम बी एस्सीच्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण करताना शनिवार दि २७ जानेवारी २०२४ रोजी पदवी वितरण समारंभ प्रसंगी आयोजित समारंभात उद्घाटन प्रसंगी केले .


या पदवी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव बोडके होते तर उद्घाटक स्वा रा ती म विद्यापीठाचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके ,प्रमुख अतिथी स्वा रा ती म विद्यापीठ चे विद्यापरिषद सदस्य तथा अध्यक्ष हिंदी अभ्यास मंडळाचे डॉ सुजितसिंह परिहार होते व्यासपीठावर प्राचार्य डॉ बबनराव बोडके , परिक्षा विभाग प्रमुख प्रा डाँ बळीराम पवार उपस्थित होते पदवी वितरण समारंभाच्या प्रारंभी महात्मा ज्योतीबा फुले आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी प्रास्ताविक मांडताना महाविद्यालयाने देश सेवेसाठी अनेक विद्यार्थी दिले, ग्राम स्वच्छेते चा वसा घेऊन स्वच्छतेच्या माध्यामातून अनेक गांवे हागनदारी मुक्त केली स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त केला त्याच बरोबर कॉपी मुक्त परिक्षा घेतल्या मुळे विद्यापीठाने उत्कृष्ट परीक्षा केंद्राचा पुरस्कार दिला, आज पदवी घेणारे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेले आम्ही पाहत आहोत असेही म्हणाले यावेळी प्रमुख अतिथी डॉ सुजितसिंह परिहार मनोगत मांडताना म्हणाले की,विज्ञान आणि तंत्रज्ञाना पेक्षा संविधानिक मुल्याच्या शिक्षणाची गरज ही काळाची गरज आहे हे युवकांनी ओळखून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा त्याच सोबत सांस्कृतिक , धार्मिक संविधानिक ,वैचारिक राष्ट्रवाद जोपासताना रोजगाराचे आव्हान स्विकारून शैक्षणिक व्यवसथेतून चांगले नागरीक घडावे असेही मार्गदर्शन केले..


यावेळी उद्घाटनपर विचार मांडताना डॉ नेटके पुढे म्हणाले की,१७ वर्षाखालील अल्पवयीन मुलं मोबाईल चा अती वापर करून समाजामध्ये वाईट कृत्य करत आहेत कायदा काही करू शकत नाही असे त्यांना वाटते हिटलरशाही त्याच्यात दिसतेय अशावेळी पदवी प्राप्त करणाऱ्या विध्यार्थ्यांनी आपल्या पदवीवर आपल्या सोबत आई- वडील भाऊ -बहीण, नातेवाईक, यानी शिक्षणात खूप कष्ठ करून मदत केल ल्याने पदवीवर त्याचा ही हक्क आहे याचे भान ठेवावे आणि रोजगारभिमुख , व्यावसायिक शिक्षण घेण्याचे आवाहन केले त्यानंतर पदवी प्राप्त करणारा विद्यार्थी कु बालुसिंग चौव्हाण यांने उत्सुर्ते मनोगत व्यक्त करताना महाविद्यालायाचा लौकिक वाढविणार असल्याचे सांगितले
यावेळी अध्यक्षीय समारोप विठ्ठलराव बोडके यांनी केला त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पदवीधर ३७ विद्यार्थ्याना पदवी वितरीत करण्यात आली या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा डॉ भारत भदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डॉ प्रभाकर स्वामी यांनी मानले या समारंभाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण , प्रा बालाजी आचार्य , प्रा संजय जगताप ,प्रा पांडुरंग कांबळे , प्रा अनंत सोमुसे , प्रा डॉ वीरनाथ हुमनाबादे , प्रा डॉ सदाशिव वरवटे , प्रा गोपाळ इंद्राळे , उद्धवराव जाधव ,प्रा अभय गोरटे , प्रा चेतन मुंढे, प्रा राजकुमार शिंदे , प्रा राजू गुट्टे ,प्रा विठल कबिर, प्रा दयानंद सुर्यवंशी, प्रा विक्रम गायकवाड , प्रा डॉ दर्शना कानवटे , प्रा पदमजा हगदळे , प्रा सुचिता मुंढे, प्रा आर्शिया मोमीन , प्रा मिरा शिदे, अनिल भदाडे, आखिल शेख शिवाजी हुबाड, किशन धरणे रा से यो विद्यार्थी प्रतिनिधी कु शुभम कांबळे, कु ओमकार क्षिरसागर कु अनिकेत लटपटे, कु संघर्ष कांबळे आदिनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button