महात्मा फुले महाविद्यालय किनगावच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत शाळा जोडणी अभियानास सुरुवात
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे
प्रतिनिधी (किनगाव महावार्ता)
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयी जाणीव जागृती निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय किनगाव च्या संयुक्त वतीने School Connect अंतर्गत आज मंगळवार दि २३ जानेवारी २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, किनगावच्या वतीने श्री संत मोतीराम महाराज कनिष्ठ महाविद्यालय व मल्हारराव होळकर कनिष्ठ महाविद्यालय किनगांव येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले दि २४ जानेवारी २०२४ रोजी भाई किशनराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, चाकुर , दि २५ जानेवारी २०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, किनगाव व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय किनगाव येथील विद्यार्थ्याना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० विषयी माहिती दिली जाणार आहे.
विद्यापीठाच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष २०२४ पासून संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
उच्च शिक्षण व्यवस्थेत संपूर्ण नूतनीकरण आणि अमुलाग्र व्यापक बदल होत असताना याची जनजागृती आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन या शैक्षणिक वर्षात बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना समुपदेशन करून नवीन येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणा विषयीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन बोडके व उपप्राचार्य डॉ. विठ्ठल चव्हाण तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. प्रभाकर स्वामी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण, जॉब ट्रेनिंग प्रोजेक्ट वर्क, औद्योगिक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठीची अकॅडमी क्रेडिट बँक, कौशल्य विकासावर आधारित शिक्षण, विद्यार्थी केंद्रीय शैक्षणिक धोरण,विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व सर्वांगीण विकासांना उपयुक्त असलेले नवीन शैक्षणिक धोरण नवीन धोरणातील संधी हे सर्वार्थाने विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी वर अवलंबून आहे.
नवनवीन संधी नवीन कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमामुळे प्राप्त होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने व बारकाईने नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून आपल्या पुढील शैक्षणिक भविष्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत मोतीराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्या सागरताई घुले, संजीवकुमार देवनाळे ,पर्यवेक्षक रामेश्वर मुंढे, पूजा स्वामी तर मल्हारराव होळकर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य रामकिशन कराड
, ऋषभ महाजन , उपस्थिती लाभली.