आता भाटसांगवी, बनसावरगाव, अजनसोंडा खु. च्या विद्यार्थ्यांची हेळसांड थांनार
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे
आता भाटसांगवी, बनसावरगाव, अजनसोंडा खु. च्या विद्यार्थ्यांची हेळसांड थांनार.
चाकूर – महावार्ता न्यूज
चाकूर ते नळेगाव बनसावरगाव मार्गे बस सेवा नसल्याने नळेगाव व चाकूर येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते. यासाठी अनेक वेळा बस डेपोत पत्रव्यवहार केला. अखेर दीपावली च्या पाडव्याच्या मुहूर्तावर दि.14 नोहेंबर 2023 मंगळवारी बस सेवा सुरू करण्यात आली.
गावात बस येताच बस चे पुष्पहार अर्पण करून विद्यार्थिनी पूजा वाघमारे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. आता विध्यार्थी व जनतेची पायपीट थांबनार आहे. याकामी जिल्हा वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. गणेश कांबळे यांच्या पाठपूराव्याला यश आले आहे.
ही बस सकाळी 7:40 ला चाकूर- लातुररोड- बनसावरगाव – अजनसोंडा खू मार्गे नळेगाव जाणार आहे. याबद्दल विध्यार्थी व जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे.