मध्य हंगाम विमा लागू करण्याची आमदार बाबासाहेब पाटील यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी!
लातूर: (महावार्ता/सुशिल वाघमारे) जिल्हाभरातील पिके माना टाकू लागली. शेतकऱ्याला लागले पावसाचे वेध..

लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नव्याने रुजू
झाल्याबद्दल वर्षाताई ठाकूर – घुगे यांची आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी भेट घेऊन सत्कार करत अभिनंदन केले.

तसेच अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पावसाने खंड दिला आहे. शेतातील पिके कोमेजून जात आहेत. शेतकरी पावसाची आतुरतेने चातकअसम वाट पाहतो आहे. अस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी भयभीत झाले आहेत तरी अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळात मध्य हंगाम विमा लागू करण्याच्या मागणीचे निवेदन दि १७ ऑगस्ट २०२३ गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
प्रसंगी समवेत चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, येलादेवी उमरगा चेअरमन राजकुमार सोमवंशी, मनोज पाटील आदी उपस्थित होते.