कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळावा संपन्न
महावार्ता न्यूज /संपादक सुशिल वाघमारे संपर्क 8623960358

कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळावा संपन्न
महावार्ता न्युज नळेगाव दि१६: नळेगाव येथील कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार आणि त्याच बरोबर पालक मेळावा ही साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव सविता सूर्यकांतराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सूर्यकांतराव चव्हाण,उपसरपंच पदमिनबाई खांडेकर, ग्रा.पं.सदस्य जनाताई शिरुरे,कावेरी गाडेकर, अनुसया तोंडारे,शमीम कोतवाल, अशफाक मुजावर,दगडु सावळकर तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष जयराम गट्टेवार,अमृत हुडगे,किशोर कुलकर्णी आणि पत्रकार शिवाजी बरचे,सुनील भोसले,ओमप्रकाश हुडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सचिव सविता सूर्यकांतराव चव्हाण आणि मुख्याध्यापक चेतन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमा प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक गोविंद वाघमारे, संगिता कट्टे,राजश्री बावगे तसेच प्रस्ताविक अमोल तोंडारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका बिरादार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अमोल मेहकरे,श्यामसुंदर भदाडे,हरीश गुनाले,भिवाजी म्हेत्रे,गणेश माचवे,धोंडीराम कदम, सौ.साबणे आणि सौ. पांचाळ यांनी परिश्रम घेतले.