५० दिवसाचे अल्टिमेटम संपले, तत्काळ अमलबजावनी करा अन्यथा
सुशिल वाघमारे संपादक महावार्ता न्यूज नेटवर्क
चाकूर माहावार्ता न्यूज:धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी,अन्यथा तिव्र आंदोलन करू,चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना देण्यात आले अल्टिमेटम.
चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते.यावेळी शासनाच्या वतीने पन्नास दिवसाचा वेळ मागितला होता.पन्नास दिवस उलटून गेली तरी आज पर्यंत शासकीय पातळीवर कोणतीही ठोस भुमिका घेतली गेली नाही,हि अतिशय खेदाची बाब आहे.मुख्यमंत्री पदी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला राजधर्म पाळावा लागतो,मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात ते सर्वांचे असतात.
एका विशिष्ट समुदायासाठी आपण खास प्रयत्न करता आणि धनगर आरक्षणाकडे उदासीनता दाखवता.ही बाब आत्यंत खेदजनक आहे.मुख्यमंत्री म्हणून आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा सकल धनगर समाजाच्या वतीने संविधानिक मार्गाने चालणार्या तिव्र लढाल्या सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा अल्टिमेटम धनगर समाजाच्या वतीने चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे.