क्राईस्ट स्कूलची विद्यार्थिनी कु. वैभवी पोतदारचे नीट परीक्षेत घवघवित यश
क्राईस्ट ची यशोशिखराकडे वाटचाल...

अहमदपूर, दि.25 (महावार्ता न्यूज/सुशिल वाघमारे) : येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्यु कॉलेज, तळेगाव, अहमदपूरची विद्यार्थीनी कुमारी वैभवी विवेक पोतदार या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत 566 गुण मिळवले. जळगाव येथील नामवंत निम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.
वैभवीचे शालेय शिक्षण क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्यु कॉलेज मधून झाले होते. दहावी बोर्ड परीक्षेतही तिने चांगले गुण मिळवले. सहावीपासून दहावीपर्यंतचे तिने या विद्यालयात शिक्षण घेतले. एक हुशार व गुणवंत विद्यार्थिनी असलेल्या वैभवीने शाळेच्या क्रिडा व इतर सांस्कृतिक विभागाच्यावतीने घेतलेल्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवत यश मिळवले होते.
कु.वैभवी यशाचे गमक सांगताना म्हणाली की, मला शाळेतील शिक्षकांचे परिपूर्ण मार्गदर्शन लाभले, माझा पाया शाळेतच पक्का झाला होता. वडील पत्रकार विवेक पोतदार म्हणाले, आमच्या परिवारात आतापर्यंत डॉक्टर घडला नाही. वैभवीने माझ्यासह तिचे आजोबा (कै. मुरलीधरराव पोतदार) यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगत शाळेतून योग्य मार्गदर्शन व मुलीची अथक मेहनत यातूनच हे शक्य झाल्याचे सांगितले. तर संस्थेचे अध्यक्ष श्री मद्देवाड यांनी या यशाबद्दल वैभवीचे कौतुक करत ग्रामीण भागात कष्टातून यश मिळवणार्या अशा विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान असल्याचे सांगितले.
वैभवीच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सि ई ओ रितू मद्देवाड, प्राचार्या जेबाबेरला नाडार, उपप्राचार्य अनिलकुमार शर्मा, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे,अनामिका शाह सर्वांवतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पालक वर्गातूनही तिचे कौतुक केले जात आहे. पुढील शिक्षणासाठी शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.