भाजप रुग्ण मित्र अभियानामध्ये इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सकांचा समावेश
महावार्ता न्यूज सुशिल वाघमारे संपादक

मुंबई (महावार्ता न्यूज) भाजप रुग्ण मित्र अभियानामध्ये इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सकांचा समावेश
सदर अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सक रुग्णमित्र म्हणून ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका पातळीवर काम करणार आहेत. दि. 3/10/2023 रोजी मुंबई येथे नामदार उपमुख्यमंत्री (म.रा.) देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, डॉ.अजित गोपछडे , प्रदेश संयोजक, वैद्यकीय आघाडी, डॉ बाळासाहेब हरपळे प्रदेश सहसंयोजक, वैद्यकीय आघाडी, डॉ राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिकात्मक पाच चिकित्सकांना “रुग्णमित्र” म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आलीत.
याप्रसंगी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशद केले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेडोपाडी रुग्णसेवा बहाल करण्यासाठी सदर वर्ष, रुग्णसेवा वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून, तशी आरोग्य सेवा देण्या करिता महाराष्ट्रातून एकूण 50 हजार रुग्णमित्र तयार करायचे ठरविण्यात आले आहे.
रुग्णमित्र म्हणून MBBS, BAMS, BHMS तसेच BEMS ईत्यादी चिकित्सकांकडून आरोग्यसेवा बहाल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त याप्रसंगी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रोहोमिओपॅथी स्पॅजिरिक चिकित्सक वेल्फेअर असोसिएशन च्या चिकित्सक सदस्यांचा सदर अभियानामध्ये समावेश केला गेला असून, संघटनेचे अध्यक्ष, मा. डॉ.सदाशिवराव धाबे, उपाध्यक्ष डॉ गिरीश माने, सचिव डॉ माधव कटके, बाळासाहेब देशमुख लातूर जिल्हा प्रमुख गौतम सोमवंशी व असोसिएशनचे अन्य पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.