धनगर समाजाच्या वतीने तब्बल दोन तास रास्ता रोको, रस्त्यावर सोडली मेंढरं
आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मतदान नाही धनगर समाजाचा निर्धार'

चाकूर – महावार्ता न्यूज सुशिल वाघमारे
चाकूर तालूका धनगर समाजाच्या वतिने अनुसूचित जमातीची (एस.टी.) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी दि.११ रोजी चाकूर येथील जुने बसस्थानक येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण दिलेले आहे.त्याची अंमलबजावणी आजतागायत कोणत्याही राजकीय पक्षांनी केलेली नाही.जवळ जवळ सर्वच पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे.त्यामुळे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही.जर घटनेतील तरतुदी प्रमाणे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून धनगर समाजाच्या आरक्षणाचे यापेक्षाही तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही,आपण निवडून दिलेल्या महाराष्ट्रातील आमदार व खासदार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी संसदेत करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश शेवाळे यांनी केली.
गणेश हाके,अॅड.माधवराव कोळगावे,गंगाधर केराळे,दयानंद सुरवसे,शिवाजी देवकत्ते,दिनकर बडुरे,अशोक करडिले,लहू कोरे,नारायण राजुरे,लिंबराज केसाळे,संभाजी बैकरे,अमर देवकत्ते,अँड.ज्ञानोबा हाके आदी समाज बांधवांनी आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी चाकूर तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.