१२ परिक्षा केद्रावर पहिल्याच दिवशी उपसंचालक, अन् बैठे पथक, विद्यार्थ्याचे पुष्प देऊन स्वागत
बोर्ड परीक्षा शांततेत, बैठे पथक केंद्रावर बसुन, उपसंचालक मोरे यांची भेट

महावार्ता न्यूज चाकुर: दिं २१ चाकुर तालुक्यात १२ बोर्ड परीक्षा शांततेत.भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर केंद्र क्र.0591 या केंद्रावर प्राचार्य डॉ. सर्जेराव आर. शिंदे व केंद्र प्रमुख प्रा.बाळासाहेब बचाटे यांनी बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्याना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
त्याना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्र प्रमुख प्रा. बाळासाहेब बचाटे यांनी ही परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.या परीक्षा केंद्रावर भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, विलासराव देशमुख महाविद्यालय, संत गोविंद बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती जुनिअर कॉलेज वडवळ ना. येथील मिळून 474परीक्षाअर्थीया पैकी 454परीक्षार्थी उपस्थित होते तर 20 परीक्षार्थी उनुउपस्थित होते.
अतिशय शांत वातावरणात व शांततेत परीक्षा सुरु आहेत. या परीक्षा केंद्राला चाकूर चे तहसीलदार रेणुकादास देवनीकर यांनी भेट देऊन समाधान व्येक्त केले. विभागीय उप संचालक डॉ. गणपत मोरे यांनी केंद्राला भेट देऊन केंद्र अतिशय शांत वातावरणात चांगले चालत असल्याचे समाधान व्यक्त केले. या केंद्रावर महसूल विभागाचे बैठें पथक होते. ऐकूनच परीक्षा शांततेत पार पडली.