मातंग समाजाच्या वतीन पुणे येथे पायी यात्रा निघणार!
महावार्ता न्यूज (संपादक सुशिल वाघमारे)

चाकूर,दि.०६
माझा लढा फक्त मातंग समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा असल्याचे प्रतिपादन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे यांनी केले.
चाकुरात मातंग समाज मेळावा व भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना चाकूर तालुका शाखेच्या वतीने भव्य मातंग समाज मेळावा व सत्कार सोहळा रविवारी येथील जुने बसस्थानक आण्णाभाऊ साठे चौकात संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर, प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,आ.बाबासाहेब पाटील, कांबळे, काशीनाथ सगट, मायाताई लोंढे,बालाजी गायकवाड,शिवाजी गायकवाड, दत्ता पुंड, शिवणखेडच्या सरपंच बायनाबाई साळुंके आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना कसबे यांनी राज्य सरकारकडून मातंग समाजाच्या विकासाच्या बाबतीत कुठलेच प्रयत्न चालवले जात नाहीत,आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय मार्गी लावला पाहिजे, बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करावी, लहुजी साळवे आयोगाच्या मान्य शिफारशी लवकरात लवकर लागू करावेत, लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांचा विषय तात्काळ मार्गी लावला पाहिजेत आणि डॉ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करुन मुंबई विद्यापीठाला आण्णाभाऊ साठेंचे नाव देण्यात यावे.या मागण्या राज्य सरकारने तात्काळ मार्गी लावाव्यात असे बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
या मेळाव्याप्रसंगी जिल्हाभरातील विविध क्षेञातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा,नुतन सरपंच, पदाधिकारी, विद्यार्थी, सेवाज्येष्टांचा सत्कार करण्यात आला.
लहुजी शक्तीसेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता पदयात्रा लक्ष्मीनगर ते अण्णाभाऊ साठे चौक येथपर्यंत काढण्यात आली.
मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी पुणे ते नागपूर पदयाञा काढण्यात येणार असून या पदयाञेत समाज बांधवांनी उपस्थित रहाण्याचे यावेळी आवाहन केले.
या मेळावा यशस्वीतेसाठी संयोजक संतराम मोठेराव,राम मोठेराव,धनराज सुर्यवंशी,दिवाकर मोठेराव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी तालुक्यातील मातंग समाज बांधव व भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.