आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सर्वात तरूण युवक नेतृत्वाला “बसवरत्न” पुरस्कार जाहिर, अभिनंदनाचा होतोय वर्षाव.

Mahavarta new Sushil Waghmare

लातुर – (महावार्ता न्यूज) चाकूर नगरपंचायत चे नगर अध्यक्ष कपील गोविंदराव माकणे यांना उमरगा – धाराशीव वीरशैव समाजा च्या वतीने मानाचा ” बसवरत्न ” पुरस्कार जाहीर झाला आहे.लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांना या पुरस्कार ने सन्मानीत केले जाते.

चाकूर नगरीच्या नगराध्यक्ष पदावर ते कार्यरत असून एक युवा अध्यक्ष म्हणून त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. आपल्या कुटुंबाच्या व्यवसायतून शेकडो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.चाकूर शहरातील वंचीत , दुबळे , निराधार लोकांना दोन वेळच मोफत जेवना ची सुरवात केली आहे.


या वर्षी हा पुरस्कार आयुष्यमान भारत वैद्यकीय समितीचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे , राज्यातील नागरी पतसंस्था चे अध्यक्ष काका कोयटे नासिक , विश्वेश्वर सह बँक पूणे चे अध्यक्ष सुनिलशेठ रूकारी , उदगीर चे माजी नगर अध्यक्ष राजेश्वर निटूरे , लोकमत चे संपादक नंदकिशोर पाटील, लातूर जि प आरोग्य अधिकारी एच व्ही वडगावे यांना या पुरस्कार ने सन्मानीत केले आहे
दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी उमरगा येथे उजैन पिठाचे जगदगुरु सिध्दलिंगराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, आ विजयकुमार देशमुख, आ ज्ञानराज चौगुले आ शरणू सलगर , आ सचिन कल्याणशेट्टी आ चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थित उमरगा येथे संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button