कर्मवीर भाऊसाहेब आंबेडकरी चळवळीतील लढाऊ व्यक्तिमत्व – प्रा बालाजी आचार्य
वाघंबर परिवाराच्या वतीने अहमदपूरात साडी चोळी कपडे वाटप

अहमदपूर (महावार्ता न्यूज)महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतून समता , स्वातंत्र्य ,बंधुत्व आणि न्याय ही मानवी मूल्ये तमाम मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पित करून मानवाची प्रगती शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी मराठवाड्या सारख्या मागास भागात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावं ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला या संघर्षात कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर आंबेडकरी चळवळीतील लढाऊ व्यक्तिमत्व अग्रेसर होते असे प्रतिपादन विचारवंत प्रा बालाजी आचार्य यांनी अहमदपूर येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित मकर संक्रांती व नामविस्तार दिन ,सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांना कपडे वाटप व शुभेच्छा कार्यक्रम सोमवार दि १५ जानेवारी , रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे उद्घाटक आवाज बहुजनाचा न्यूज चॅनलचे संपादक शिवाजीराव गायकवाड प्रमुख मार्गदर्शक विचारवंत प्रा बालाजी आचार्य होते तर माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे सामाजिक नेते गोपीनाथ जोंधळे , डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी , बाबासाहेब वाघमारे ,शेषराव ससाणे , एस एल जाधव , शाहुताई कांबळे ,शकुंतला बनसोडे , सपोनि शिवकुमार बिराजदार, पञकार भिमराव कांबळे, गणेश मुंढे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन आवाज बहुजनाचा न्यूज चॅनलचे शिवाजीराव गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा निमंत्रक अरुणभाऊ वाघंबर मांडताना म्हणाले कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या अथंक संकल्पनेतून गेल्या ३४ वर्षा पासून महिलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे तो सामाजिक उपक्रम पुढे ही कुंटूबियाच्या वतीने सुरु राहिल अण्णाचा वसा आणि वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करू असे अभिवचन दिले
यावेळी उद्घाटन झाल्याचे शिवाजीराव गायकवाड यांनी जाहिर केले त्यानंतर सरस्वतीबाई कांबळे , बाबासाहेब वाघमारे , डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी , गोपिनाथ जोंधळे यांनी समायोचित मनोगत मांडले याप्रसंगी पुढे बोलताना प्रा आचार्य म्हणाले की ,कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी दलित , वंचित , शोषित , पिढित यांच्यासाठी गायरान जमीन ,शिष्यवृत्ती आणि अन्याय , अत्याचाराच्या विरोधात लढा उभा केला सोबतच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा लढताना मोर्चा ,आंदोलने केली प्रसंगी जेल भोगली समर्पित भावनेने काम केले त्यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रमांतर्गत महिलांना कपडे वाटप केले जात आहेत हा स्तुत्य कार्यक्रम आहे असेही म्हणाले आणि कौतूक केले कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना बाबासाहेब कांबळे यांनी स्व अनुभव कथन करत नामांतर लढ्यातील भाऊसाहेब वाघंबर ,रफिक भाई अहमद, त्यागी ,समर्पित लढाऊ पँथर ला सलाम केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संयोजिका अंजलीताई अरुण वाघंबर यांनी मानले आणि मान्यवराच्या शुभहस्ते .४८० महिलांना तिळगुळ, साडी चोळी, कपडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी कु अदित्य वाघंबर , कलीम शेख , रितेश वाघंबर , अनिल वाघमारे, संजय वाघंबर , डाँन वाघमारे, रितेश बनसोडे , अश्विनी वाघंबर , राणी गायकवाड, आशा कांबळे , दैवशाला वाघंबर , आकाश व्यवहारे , विकास व्यवहारे आदि कार्यकर्त्यानी
परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील व शहरातील महिला उपस्थित होत्या रात्री उशिरा पर्यत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मंगल सोनकांबळे , सुप्रसिद्ध भीमशाहीर श्रीरंग गायकवाड आणि त्यांचा संच यांचा बुद्ध भीम गितांचा कार्यक्रम सुरु होता