कबबुलबुल स्काऊट गाईड जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात साजरा, समता शोभायात्रेने चाकूरकरांची नेत्र सुखावली.
वॉटरपार्कचा लुटला आनंद, बीएसएफ मद्ये शस्त्रांची घेतली माहिती.

चाकूर प्रतिनीधी (महावार्ता न्यूज): येथील साई नंदनवन अम्युजमेंट वॉटर पार्क येथे दि १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान भारत स्काऊट गाईड कब बुलबुल चा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते रविवारी ११ च्या सुमारास करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष कपील माकणे नगराध्यक्ष न.प.हे होते. प्रसंगी स्काऊट गाईड च्या लातूर जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे , चिटणीस संजय क्षीरसागर, सह चिटणीस अरुणा कांदे, कोषाध्यक्ष तथा उप शिक्षण अधिकारी प्रमोद पवार, गटशिक्षण अधिकारी जयसिंग जगताप , संघटक डॉ शंकर चामे , नंदनवनम् अम्युजमेंट पार्क चे मालक विशाल जाधव , सौदागर एच एस. माने युवराज यांच्या उपस्थितीत झाले.
या मेळाव्याचे आयोजन नियोजन याबाबत प्रास्ताविकातून डॉ शंकर चामे यांनी माहिती दिली तर शिस्त ,त्याग, मूल्य आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी कब बुलबुल स्काऊट गाईड काय आवश्यकता आहे. याबाबत मार्गदर्शन केले.
तर उद्घाटक खासदार सुधाकर शृंगारे यांनी शाळेतील विद्यार्थी जीवनातील प्रसंग सांगितले. विद्यार्थीनी आपले धेय्य निश्चित केले पाहिजे. आपणास इंजिनियर, डॉक्टर, वकील की राजकिय नेता बनायचे आहे हे आपण स्वतः ठरवेले पाहिजे मात्र आई वडील व आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आपण सैन्यात गेले पाहिजे. देशसेवा केली पाहिजे असे मत मांडले.
अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी स्कॉट्सनी सजवलेले तंबू सजावट , स्वच्छता, ओला कचरा सुका कचरा व्यवस्थापन, लाकडापासून बनवलेले हँगर, चप्पल स्टॅन्ड , सोपा पाहणी केली असता सर्व काही खूप छान वाटले आणि असेच भविष्य स्वच्छ सुंदर जगा असा संदेश दिला.
सोमवारी दिं.११ रोजी सायंकाळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी शेकोटी कार्यक्रमास भेट दिली विद्यार्थ्याचे संचलन पाहून भारावून गेले. एखाद्या प्रशिक्षित जवानांनी सादर करावे असे संचलन आणि प्रात्यक्षिके पाहून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
चार दिवस चाललेल्या या मेळाव्यात कबबुलबुल स्काऊट गाईड यांनी तंबू सजावट, शेकोटी कार्यक्रम बिन भांड्याचा स्वयंपाक निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा चित्रकला पोस्ट स्पर्धा बँड पथक संचलन स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा सहाशे खेळ , शारीरिक प्रात्यक्षिके ,
सांस्कृतिक कार्यक्रम, समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जगत जागृती विद्या मंदिर ते जिल्हा परिषद शाळा चाकूर असा विविध वेशभूषा, सामाजिक, धार्मिक, भारतीय संस्कृतीचे देखावे, लेझीम, टिपरी, बँड पथक संचालन, असे अनेक विविध प्रकारचे देखावे सादर करून चाकूरकरांचे नेत्र सुखावले.
चार दिवस चाललेल्या या मेळाव्याचे बक्षीस वितरण साई नंदनवनम् चे मालक विशाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भा.ई. नगराळे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी राज्य मुख्य आयुक्त भारत स्काऊट गाईड, राज्य प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, डायटच्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी, उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार, शिवदर्शन स्वामी, निशिकांत निरकले, विस्तार अधिकारी बालाजी बावचे,प्रा श्रीहरी वेदपाठक , शरद हुडगे, यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी बोलताना भा. ई. नगराळे म्हणाले की स्काऊट गाईड चळवळ ही संस्काराची चळवळ आहे एवढेच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारी ही चळवळ आहे. विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घरातील त्यासाठी जवळ काम करते केवळ जिल्हा राज्यात किंवा देशात नव्हे तर जगातील 167 देशांमध्ये स्काऊटची चळवळ कार्यरत आहे. चाकूर येथे जिल्हास्तरीय मेळावा अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला याबाबत कब बुलबुल स्काऊट गाईड स्काऊटर्स अँड गाईड सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन करून ही चळवळ कायम सुरू रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

तर डॉ भागीरथी गिरी यांनी मूल्य संस्कार,एकात्मता आणि माणुसकीचे दर्शन या मेळाव्यातून घडले आहे असा आशावाद व्यक्त केला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कब बुलबुल, स्काऊट गाईड, स्कूटर गायडर यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून भारत स्काऊट गाईड चे लातूर जिल्हा संघटक डॉ शंकर चामे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हान्स टीम सौदागर एच एस, चंद्रशेखर भालेराव, मीडिया प्रमुख सुशील वाघमारे, कंदील जयेश, केंद्रे अंकुश, पांचाळ संजय, ढोकाडे ज्ञानोबा, नलमारी रमेश ,स्वामी शुभांगी, कोल्ले आरती, हरळी नामदेव माने युवरा पाटील धोंडीराम, सुरवसे सचिन यांच्या प्रयत्नातून जिल्हा मेळावा यशस्वी झाला. या मेळाव्यातील संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गिरी यांनी केले तर आभार अरुणा कांदे यांनी व्यक्त केले.