आदर्श शिक्षक समितीची तालुका कार्यकारीनी जाहीर तालुकाध्यक्ष पदी स्वामी, वाघमारे, चाटे यांची निवड..
राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ यांच्या उपस्थितीत निवडी

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या जि.प. तालुका अध्यक्षपदी शिवराज स्वामी यांची निवड.
# खाजगी शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी सुशिल वाघमारे.
चाकूर दि. 1 (महावार्ता न्यूज) येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची तालुकास्तरीय बैठक व कार्यकारिणी निवड सभा मंगळवारी घेण्यात चाकूर येथे आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण दावणकर तर प्रमुख मार्गदर्शक राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या जि.प. चाकूर तालुका अध्यक्षपदी शिवराज स्वामी यांची तर खाजगी शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी सुशिल वाघमारे,

तर महिला अध्यक्षा चंद्रकला चाटे सरचिटणीस अनिल रोहिनेकर,कार्याध्यक्ष बलराज गोरे, उपाध्यक्ष तुकाराम गुडपल्ले, सहसचिव प्रकाश हेंगणे,तालुका शिक्षक नेते चंद्रशेखर मिरजकर,सल्लागार सुरेश केंद्रे,संजय इंद्राळे,बाळासाहेब धुप्पे, ओमप्रकाश सुवर्णकार ,अशोक बने ,बालाजी दहिफळे तर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून गोविंदराव कोडरुल जिल्हा संघटक शिवदत्त पांचाळ यांची निवड राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दावणकर, डॉ बालाजी समुखराव, यांनी समितीच्या कार्याबद्दल माहिती विशद केली. तर शिवाजीराव साखरे यांनी शिक्षण पद्धती ,शिक्षकांच्या समस्या आणि संघटन बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आदर्श शिक्षक समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली.
.दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शिक्षण पद्धती राबविली तर नक्कीच शिक्षकांना चांगले दिवस येतील असा आशावाद यावेळी मांडला. प्रसंगी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून शिक्षकांचे संघटन बांधणी मजबूत करून आपल्या न्याय हक्काचा लढा उभा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवदत्त पांचाळ,प्रास्ताविक वाल्मिक पंदे यांनी केले तर आभार शिवराज स्वामी यांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे उपाध्यक्ष अशोक पांचाळ,राम दावणकर डॉ बालाजी समुखराव यांच्यासह शिक्षक बांधव उपस्थित होते.
यांच्या निवडीबद्दल शिक्षक क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे..