धोरणात्मक बदल आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी खा सुधाकर शृंगारे यांना लोकसभेत पाठवा – माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
संपादक सुशिल वाघमारे

महावार्ता न्यूज लातूर: महायुतीचे उमेदवार सुधाकरज श्रंगारे यांच्या प्रचारार्थ निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित नागरिक बंधू-भगिनींशी संवाद साधला.
ही निवडणूक देश हिताची व स्वाभिमानाची आहे. आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाचे नाव मोठे करण्याचे काम केले आहे. आज जगात देशाचे नाव सर्वात प्रगतशील देश म्हणून घेतले जात आहे. राष्ट्रहिताबरोबरच जनतेला आत्मनिर्भर करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
आदरणीय मोदीजींनी केलेल्या कामाचा सर्व लेखाजोखा मतदारांपुढे आहे. गेल्या ६५ वर्षाच्या कॉग्रेसच्या काळापेक्षा अधिक गतीने विकास कामी या सरकारने केली आहेत. मोदी सरकारने महिलांना व शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी संकल्प केला आहे. धोरणात्मक बदल करुन अर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. महिला सुरक्षा व संविधान जोपासण्याचे काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष मिलिंद लातूरे, रा.कॉ. पंडीत धुमाळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीरजी पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती संजय दोरवे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडुजी सोळुंके, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, माजी जि.प. सदस्य डॉ. संतोषजी वाघमारे, प्रशांतजी पाटील जवळेकर, माजी सरपंच अंगदराव माने, कृ.उ.बा. सदस्य धनराज माने, दत्ता मोहोळकर, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उमाताई मोरे, संध्याताई पाटील आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.