अस्मानी संकटांनी घेतला लातूर जिल्ह्यातील तिघांचा बळी, गुरे पशू पक्षी दगावली, झाडे उन्मळून पडली फळ बागांचे मोठे नुकसान.
चाकुर तालुक्यातील वीज कोसळून दोघांचा तर निलंगा तालुक्यातील झाड कोसळून एकाचा मृत्यू,
महावार्ता न्यूज चाकूर: शेतकरी राजा पेरणीपूर्वीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊसाबरोबर सोसाट्याचा तुफान वारा वाहू लागला आहे .रविवारी वीजा वादळीवाऱ्यासह पाऊस झाला यात दोन तरुण शेतकऱ्यांना जीव गमावावा लागला.
अस्मानी संकटाचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येत आहे. शेतीची उरली सुरली कामे करून पेरणीच्या तयारीत असतानाच रविवारी २६ मे २०२४ रोजी ४ च्या सुमारास झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले. वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या विजांचा कडकडाट झाला आणि चाकूर तालुक्यातील महाळंगी, झरी सह अनेक गावाला याचा चांगलाच फटका बसला. वीज पडून महाळंगी येथील दोन तरुण शेतकरी दगावले. मृतांमध्ये शिवाजी नारायण गोमचाळे वय ३५ यांच्या पश्र्चात १ मुलगा; गरोदर पत्नी आई वडील असा परीवार आहे.तर ओमशिवा लक्ष्मण शिंदे वय ३० यांच्या पश्चात ४ मुली पत्नी आई वडील असा परीवार आहे. यांचा नारायण गोमचाळे यांच्या गट क्रमांक 189 मध्ये शेतात काम करताना वीज पडून मृत्यू झाला.
तर शिवणखेड बु येथील प्रभू रामा कोंपले यांच्या म्हशीवर वादळी वाऱ्याने झाड कोसळून मृत्यू झाला. झरी खु येथील गणेश सूर्यवंशी या तरुण शेतकऱ्याच्या केळी बागेचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले.
चाकुर तालुक्यातील अनेक गावात घरांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडणे , विद्युत खांबे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. झाडाखाली लावलेल्या ऑटो, ट्रॅक्टर वर झाडे कोसळून त्यांचेही नुकसान झाले आहे.
अचानकपणे उद्भवलेल्या अस्मानी संकटाने जीवित हानी तर झालीच शेतकरी सामान्य नागरिकांची धावपळ उडवणारा आजचा पाऊस वादळवारा ठरला .
लातूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात काय स्थिती आहे.
निलंगा:
पानचिंचोली तालुका निलंगा येथील बळीराम व्यंकट हणमंते वय 35 यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ते मयत झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत.
मौजे शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुका: हालकी ता. शिरूर अनंतपाळ येथे ठीक पाच वाजता गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली.
लातूर तालुका : तांदुळजा तालुका लातूर येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव (कृष्णानगर तांडा) तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.