स्वामी विवेकानंदची शितल सोमवंशी चापोली केंद्रात प्रथम.
स्वामी विवेकानंद विद्यालयाचा निकाल १००%

चापोली: शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा नुकताच निकाल जाहीर झाला. शितल सिद्धार्थ सोमवंशी या विद्यार्थिनीने 95.80% गुण मिळवून चापोली केंद्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागला असून विद्यालयातून एकूण 46 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यापैकी 14 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत तर 17 विद्यार्थ्यांनी 75 ते 90% गुण प्राप्त केले आहेत.अभिषेक विश्वेश्वर स्वामी या विद्यार्थ्याने 94.40% प्राप्त करून विद्यालयातुन द्वितीय क्रमांक मिळविला तर तृतीय क्रमांक श्रेयश शिवशंकर स्वामी 94.20%गुण घेत मिळविला आहे.तसेच प्रतिक्षा मरेवाड व आकांक्षा बलशेटवार यांनी 94% गुण प्राप्त केले आहेत.
आदित्य शिंदे,मोक्षदा माने,प्रतिक्षा गोपीनाथ श्रीमंगले, श्रावणी बालाजी महाजन, संध्या बबन पिल्ले,योगेश्री संग्राम शिंदे,गौरी गणेश तेलंगे, मयुरी विलास सोमवंशी,राधा बेल्लाळे या विद्यार्थ्यानी 90%पेक्षा जास्त गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाची शान वाढवली आहे. चापोली व पंचक्रोशीतील स्वामी विवेकानंद विद्यालय हे शिक्षणाच्या बाबतीत नावाजलेल विद्यालय असून येथे ज्ञानाबरोबर संस्काराची शिदोरी ही विद्यार्थ्यांना दिली जाते.गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन रामगीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंदर तेलंगे,माजी सरपंच किशनराव मुर्गे,माजी चेअरमन बाबुराव तरगुडे,माजी चेअरमन भाऊसाहेब मुर्गे,मुख्याध्यापक तथा संचालक व्यंकटेश बाबुराव शिंदे, मुख्याध्यापक माधव होनराव,
सहशिक्षक विठ्ठल गवळे,दहावी वर्गशिक्षक परमेश्वर मोटाडे, वरिष्ठ लिपिक गोरखनाथ सावरगावे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले आहे.