वकील संघाची जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांच्या कडे काय आहे मागणी?
लातूर महावार्ता संपादक सुशिल वाघमारे

लातूर महावार्ता न्यूज दि.०६ ऑक्टोर २०२३ रोजी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या शिस्ट मंडळाद्वारे जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे यांची भेट घेत लातूर शहर व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नविन दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सद्य परिस्थितीत लातूर शहर व परिसरातील नागरिकांची लोक संख्या, वाढत चालेला विस्तार पाहता खरेदी विक्रीचे व्यवहार व दस्त नोंदणीसाठी कार्यरत असलेले दोन्ही दुय्यम निबंधक कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण निर्माण होत आहे त्यामुळे दस्त नोंदणीसाठी पूर्व नोंदणी करून ही वेळेवर नोंदणी होत नसल्याने नागरिकांना,पक्षकारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
दस्त नोंदणीसाठी दस्त पूर्व नोंदणी (बुक)केलेल्या दस्ताची वेळेवर, अनुक्रमानुसार नोंदणी करावी जेने करून कोणाचे ही वाद होणार नाहीत , नेट सुविधा सुरळीत चालत नसल्याने सर्व्हर डाऊन होवून दस्त नोंदणीचे काम थांबते त्यामुळे नेट सुविधा हाय स्पीड सुव्यवस्थित करण्यात यावी, दररोज नोंदणी झालेले दस्त वेळेवर स्कॅन करुन घ्यावे, दस्त नोंदणीसाठी नियमित नोंदणी अधिकारी कायम स्वरुपी करण्यात यावा, दुय्यम निबंधक कार्यालयात पुरेशी आसन व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता गृह, सिसी टिव्ही कॅमेरा व्यवस्था आदी व्यवस्था नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे, उपाध्यक्ष अँड गजानन चाकूरकर, ग्रंथालय सचिव अँड संतोष सोनी, अँड एस जी विश्र्वेकर, अँड संदिप औसेकर, अँड एस जे तापडिया, अँड ललित तोषणीवाल आदी उपस्थित होते.