आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जिल्ह्यात तरूण सैनिक शहीद, पण भाजप नेत्यांचे सत्कार सोहळे.

अकोला महावार्ता न्युज : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाले.शहीद जवानाचे पार्थिव गावात आज पोहचणार आहे. मोरगाव भाकरे गावातील तरुणाला वीरमरण आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.असे असताना काल भाजपचे आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री अकोला जिल्ह्यात सत्कार सोहळे साजरे करत फिरत असल्याचे चीड आणणारी घटना घडली आहे.


हा शहीद सैनिकाचा आणि त्याचे कुटुंबियांचा अपमान आहे, संवेदना नसलेले जनप्रतिनिधी ह्यांनी माणुसकीला काळीमा फासला आहे, ह्यासाठी भाजपचे जनप्रतिनिधी आणि सत्काराच्या बातम्या फोटो व्हिडिओ प्रसारित करणारे भाजप पदाधिकारी ह्यांनी देशसेवा करणारे शहीद सैनिकाचा अपमान केला आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.

अकोला जिल्हा मध्ये कालच महार रेजिमेंट मधील तरुण देशसेवा बजावताना शहीद झाल्याची बातमी आली होती.त्यामुळे संपूर्ण जिल्हयात दुःखाचे वातावरण होते.लग्नाला उणेपुरे एक वर्ष पूर्ण झालेला.तरुण देशसेवा बजावताना शहीद होणे ही दुःखाची गोष्ट आहे.शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

जंजाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबासोबतची ही शेवटची भेट ठरलीहोती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अशा शोकाकुल वातावरणात भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे हे काल चोहट्टा येथे नागरी सत्कार स्वीकारत होते. त्यांचे बरोबर भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर देखील सत्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री ह्यांचे मराठा मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात हजेरी लावली आणि सत्कार स्विकारलेहा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असल्याचेही पातोडे यांनी म्हटले आहे.

आपल्या जिल्ह्यात एक तरुण सैनिक देशासाठी शहीद झाल्याचे जराही दुःख आमदार खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री यांना असू नये ? ही चीड आणणारी बाब आहे.एवढेच नाही तर ह्याच दोन्ही सत्कार सोहळ्याचे फोटो व्हिडिओ भाजपाचे नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या ग्रूपवर शेयर करून शहीदाचे अपमानात भर घालीत असल्याचे निंदाजनक कृत्य करीत होते.

शहीद सैनिक आणि त्यांचे कुटुंबाचे सांत्वन करने, आज होणाऱ्या अंतिम संस्कार सोहळ्यासाठी मोठया प्रमाणावर सुरू असलेल्या पावसात शहीद सैनिकाचे अंतिम संस्कार साठी व्यवस्था करायला अधिकारी कर्मचारी ह्यांचे सोबत बैठक घेणे अपेक्षित होते.मात्र त्यांनी नैतिक राजकारण गुंडाळून ठेवले आहे. जनता ह्यासाठी भाजपवाल्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नसल्याचेही पातोडे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button