जिल्हा परिषद आदर्श शिक्षिकेने जन्मदिनानिमित्त अनोखी भेट.
मुख्य संपादक रंगनाथ बी वाघमारे

महावार्ता न्यूज: जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने शनिवारी जन्मदिनी अनोखा उपक्रम राबविला. आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची गरज पाहून विद्यार्थ्यांना स्वखर्चातून वाटप केल्या सायकली.
१३ जुलै २०२४ जिल्हा परिषद बनसावरगाव येथे पालक मेळावा घेण्यात आला. उपस्थित पालकांना मुख्याध्यापक जनार्धन घंटेवाड यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे बाबत चर्चा केली व सह शिक्षिका शामल सोडले/घंटेवाड यांच्या जन्मदिनानिमित्त गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट पाहता ईयत्ता पाचवी च्या सर्व विद्यार्थ्यांना TATA /HERO नामांकित कंपन्यांच्या सायकल भेट देण्याचे ठरवले.
विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना व्हेज पुलाव ,मिठाई देण्यात आली याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, सरपंच उषाताई कांबळे,
साधन व्यक्ती भालके प्रकाश, रवि देशमुख, शिवमूर्ती माने मतीन शेख,गोविंद बोडके, नागनाथ शिंदाळे,महेश बनसोडे, नंदकिशोर सुडे, तुळशीदास माने,अजय धनेश्वर, जनार्दन कांबळे, ज्ञानोबा घंटेवाड,अजय नाचारे, रामेश्वर घंटेवाड,खंडू जाधव, अजित घंटेवाड,हाणमंत गायकवाड,दिपक घंटेवाड,लक्ष्मण भंडे, नागनाथ घंटेवाड, योगेश घंटेवाड, वैजनाथ नरहारे,शुभम घंटेवाड इत्यादी उपस्थित होते.