सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत अनोखा प्रयोग
मुख्य संपादक रंगनाथ बी वाघमारे
ठाणे महावार्ता न्यूज: पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, शुद्धहवा,सुंदर निसर्ग हवा असेल तर वृक्षलागवड केली पाहिजे. वृक्षांचे महत्त्व कोविड काळात सर्वांना ज्ञात झाले आहे. ऑक्सीजिन किती महत्वपूर्ण आहे हे आपण जाणून घेतले आहे. हे सर्व पाहता. वृक्ष लागवड करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत यात ठाण्यातील ‘निर्मल यूथ फाउंडेशन’ आणि ABCD फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी प्रमुख पाहुणे संदीप पाचंगे यांच्या उपस्थितीत ‘येऊर हिल्स’, ठाणे येथे वृक्षारोपणाच कार्यक्रम १४/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले. संस्थेच्या सभासदांनी मिळून ६० स्वयंसेवकासोबत ६५ रोपे लावली.
यावेळी निर्मल युथ फाउंडेशन च्या अध्यक्षा अक्षता शिंदे, आकाश शिंदे, विनिता चाहेर याकामी पुढाकार घेतला तसेच ABCD फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत मिरशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच ठाणे कॉलेज चे एन एस एस युनिट व ‘Rajyabhishek फाऊंडेशन’ संस्थेच्या सभासदांचीही उपस्थिती या कामी लागली.
‘निर्मल यूथ फाउंडेशन’ या संस्थेद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. मागील वर्षी गणपती उत्सवादरम्यान सुमारे २१.४९६ हजार किलो एव्हढे निर्माल्य संस्थेने डोंबिवलीतल्या विसर्जन केंद्रांवरून गोळा करून शासनाच्या ताब्यात दिले होते. असे पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवण्याचे कार्य संस्थे तर्फे २०१७ सालापासून चालू झाले आहे.
‘ABCD फाउंडेशन’ हि गरजू विद्यार्थ्यांना आणि गरीब मुलांना शालेय व इतर चीजवस्तू देण्याचे कार्य २०२२ सालापासून करत आहे. अश्या प्रकारे भर पावसात सर्व संस्थेच्या सभासदांनी मिळून “माझी वसुंधरा” हा प्रकल्प राबविण्यासाठी खारीचा वाटा उचलला.
वृक्ष लागवड करताना निसर्गप्रेमी युवक युवती