निराधार, वंचित, दिव्यांगासाठी खास उपक्रम, जनहितार्थ कार्याबद्दल कौतुक.
महावार्ता न्यूज नेटवर्क संपादक सुशिल वाघमारे

चाकूर,दि.१६
श्री कपिलानंद प्रतिष्ठान द्वारा संचलित ओम साईप्रसाद अन्नछञाचा शुभारंभ गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला.
नगराध्यक्ष कपील माकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा शुभारंभ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास नितीन शेटे,प्रकाश वलसे,सुधाकर लोहारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
8
चेअरमन डॉ गोविंदराव माकणे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या साईप्रसाद अन्नछञाचा चाकूर शहरातील वंचित, निराधार, अबालवृध्द, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसह १०० गरजुंना दररोज मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या योजनेतील प्राथमिक पाच लाभार्थ्यांना गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ओळखपञ देवून सत्कार करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माकणे कुटुंबियांनी येथील नागरिकांसाठी साईप्रसाद अन्नछञाचा राबविलेला उपक्रम हा सामाजिक असून माणसाला अन्नाच्या माध्यमातून मिळणारे पुण्य दुसरे कशातच नसते.अन्न हे पूर्ण ब्रह्म असून माणसाला जगण्यासाठी अन्नाची नित्तांत गरज असते या पलिकडे कुठलाच दुसरा आनंद नसल्याचे सांगून या योजनेला शुभेच्छा दिल्या.यावेळी नगराध्यक्ष कपील माकणे यांनी ही योजना सुरु करण्याचा हेतू सांगून ही योजना नागरिकांच्या सेवेत कायम चालूच राहणार असल्याचे सांगितले.
प्रास्तविक व्यंकटराव धोंडगे,संचलन हाकानी सौदागर,आभार नारायण बेजगमवार यांनी मानले.
या कार्यक्रमाला
सोसायटीचे व्हा.चेअरमन जाकीर कोतवाल,एमआयडीचे चेअरमन अब्दुल करीम शेख,उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,नितीन रेड्डी,बाळू लाटे,शिवकुमार सोनटक्के,अजय नाकाडे,सागर होळदांडगे,प्रकाश तेलंग,मन्मथ पाटील,पंडीत मोरे,डॉ एन.जी मिर्झा,अरविंद जोशी आदीजण उपस्थित होते.