व्ही एस पँथर्स च्या जिल्हाध्यक्ष पदी शरद किणीकर तर विधीविभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रतिक कांबळे
चळवळीत चांगले काम करताना एखादा गुन्हा दाखल झाला तरी डगमगायचे नाहीं... म्हस्के

लातूर (महावार्ता न्यूज) येथील भालचंद्र ब्लड बँक या ठिकाणी मंगळवारी (दि ९) सं अध्यक्ष विनोद खटके यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये नूतन जिल्हा अध्यक्षाची निवड करण्यात आली चाकूरचे तालुकाध्यक्ष शरद किणीकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विधी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्ध विधीज्ञ प्रतीक कांबळे तसेच जिल्हाउपाध्यक्ष पदी आबासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी लातूर जिल्ह्यातील अनेक युवकांनी व्ही एस पँथर्स संघटनेत प्रवेश केला यामध्ये आबासाहेब गायकवाड, नाना कांबळे, राहुल सूर्यवंशी, कैलास सातपुते, सुरज सातपुते ,प्रथमेश बनसोडे, हिद्यात पठाण, विशाल ढाले, विशाल चक्रे, विष्णू गायकवाड, इम्रान शेख, किशोर कांबळे, आकाश मस्के, अनिकेत कांबळे, आनंद धावरे, गंगाधर मस्के, सुनिल आदमाने, ऋषिकेश गायकवाड, वैभव कांबळे, जयराम आदमाने, दत्ता इडेकर, दिनेश चक्रे, प्रतेश सोमवंशी, निखिल कांबळे, अक्षय गवळी यांचा समावेश आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांनी सांगितले की संघटनेत काम करत असताना अडचणी सोडवताना एखाद्या गुन्हा जरी दाखल झाला तरी न घाबरता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान केले.
यानंतर अध्यक्षीय समारोप करत असताना विनोद खटके यांनी प्रवेश घेतलेल्या सर्व युवकांचे संघटनेमध्ये स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीवर आंदोलन उभे करण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली तसेच महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जी वस्तीगृह आहेत त्या वस्तीगृहाना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले.
या बैठकीला ग्रुप अध्यक्ष अमोल कांबळे, संपर्कप्रमुख आनंद जाधव, नूतन जिल्हाध्यक्ष शरद किणीकर विद्यार्थी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ, शहराध्यक्ष असदभाई शेख, कामगार आघाडी शहर अध्यक्ष गौस शेख, कामगार आघाडी जिल्हा संघटक गोविंद कांबळे, रेनापुर तालुका अध्यक्ष राज तरकसे, औसा तालुकाध्यक्ष सुनील सातपुते, निलंगा तालुकाध्यक्ष दाजीबा कांबळे, संतोष कांबळे, नारायन चव्हाण, सिध्दार्थ वाघचौरे, विनोद वाघचौरे, दयानंद हरूंगुरकर, संतोष जाधव, अजय भूताले, संभाजी गोने, अजय वाघमारे, हुसेन मांदळे सह पदाधिकारी उपस्थित होते